उत्सव रंग यंदाच्या नवरात्रीचे ‘हे’ आहेत नऊ रंग; साडी सोबत घाला मॅचिंग मास्क
यंदाच्या शारदीय नवरात्राला शनिवार, १७ ऑक्टोबर २०२० रोजी घटस्थापनेनंतर प्रारंभ होईल. देशभरात नवरात्र मोठ्या उत्साहात साजरे केले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. या निमित्ताने यंदाच्या नवरात्रीचे कोणते नऊ रंग आहेत ते जाणून घेऊया.
1/9
नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा म्हणजेच १७ ऑक्टोबर शनिवारचा रंग हा करडा (ग्रे) आहे.
2/9
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाचा म्हणजेच १८ ऑक्टोबर रविवारचा रंग हा संत्रा म्हणजेच ऑरेंज आहे.
3/9
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचा म्हणजेच १९ ऑक्टोबर सोमवारचा रंग हा पांढरा आहे.
4/9
नवरात्रीच्या चौथ्या दिवसाचा म्हणजेच २० ऑक्टोबर मंगळवारचा रंग हा लाल आहे.
5/9
नवरात्रीच्या पाचव्या दिवसाचा म्हणजेच २१ ऑक्टोबर बुधवारचा रंग हा गडद निळा आहे.
6/9
नवरात्रीच्या सहाव्या दिवसाचा म्हणजेच २२ ऑक्टोबर गुरुवारचा रंग हा पिवळा आहे.
7/9
नवरात्रीच्या सातव्या दिवसाचा म्हणजेच २३ ऑक्टोबर शुक्रवारचा रंग हा हिरवा आहे.
8/9
नवरात्रीच्या आठव्या दिवसाचा म्हणजेच २३ ऑक्टोबर शनिवारचा रंग हा मोरपंखी आहे.
9/9
नवरात्रीच्या नवव्या दिवसाचा म्हणजेच २४ ऑक्टोबर रविवारचा रंग हा जांभळा आहे.
We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use. More Information.