आता मज्जा घ्या गारेगार प्रवासाची ; सुरू झालीये सीएसएमटी ते कल्याण एसी लोकल, पाहा फोटो

मुंबईः पश्चिम रेल्वेपाठोपाठ (Western Railway) आता मध्य रेल्वेवरही एसी लोकल धावू लागली आहे. मध्य रेल्वे (Central Railway) च्या सीएसएमटी ते कल्याण (CSMT to Kalyan) मुख्य मार्गावर एसी लोकलला १७ डिसेंबरपासून सुरूवात झाली आहे. तसेच पहिली ट्रेन कुर्ला (Kurla) स्थानकातून रवाना झाली होती. तसेच सीएसएमटी ते कल्याण स्थानकादरम्यान १० फेऱ्या होणार आहेत. सोमवार ते शनिवार अशा सहा दिवसांसाठी एसी लोकल (AC Local) सुरू राहणार असून सर्वच स्थानकांवर ही लोकल थांबणार आहे.