1/9
2/9
आदिती पंत : आदिती पंत यांचा जन्म नागपूर शहरामध्ये झाला. त्यांनी तरुण वयातच विज्ञानात रस घ्यायला सुरुवात केली. पुणे विद्यापीठात विज्ञान शाखेत पदवीचे शिक्षण घेत असताना ॲलिस्टर हार्डी यांनी लिहिलेले दी ओपन सी हे पुस्तक अदिती पंत यांच्या वाचनात आले. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन समुद्रविज्ञानातच करिअर करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आदिती पंत अंटार्क्टिकावर पाऊल ठेवणाऱ्या पहिला भारतीय महिला आहेत. १९८३मध्ये आदिती पंत यांनी भारताच्या अंटार्क्टिक मोहिमेत भाग घेतला. त्यानंतर भारत सरकारने त्यांचा अंटार्क्टिका पुरस्कार देऊन सन्मान केला.

3/9
सुचेता कडेठाणकर : सुचेता कडेठाणकर ही पुण्याची कन्या. तिने १५ जुलै २०११ ला आशियातील सगळ्यात मोठे वाळवंट अशी ओळख असलेले गोबी वाळवंट चालत पार केले आहे. साधारण १,६०० किलोमीटरचे गोबी वाळवंट पादाक्रांत करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.

4/9
राहीबाई पोपेरे : अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यातील कोभाळणे येथील ‘सीड मदर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपरे यांनी गावरान आणि जैवविविधता असलेल्या पिकांच्या जातींचे जतन केले आहे. त्यांना कृषी क्षेत्रात वेगळा आणि वैविध्यपूर्ण प्रयोग केल्याबद्दल त्यांना भारत सरकारकडून  नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले  आहे.

5/9
अनिता डोंगरे : अनिता डोंगरे हे नाव फॅशन इंडस्ट्रीमध्ये सन्मानाने घेतले जाते. मुंबईत जन्मलेल्या या फॅशन डिझायनरने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवणकामासाठी २ मशीन घेऊन व्यवसायाला सुरुवात करणाऱ्या अनिता डोंगरे या ८०० कोटीपेक्षा जास्त रुपयांच्या कंपनीच्या मालकीण आहेत.

6/9
मेघना एरंडे – जोशी : मेघना एरंडे आपल्याला एक अभिनेत्री म्हणून माहीत आहेतच मात्र त्यासोबतच एक व्हॉईसओव्हर आर्टीस्ट आणि डबिंग आर्टीस्ट म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे. नॉडी  या कार्टुन कॅरेकटरचा आवाज असो किंवा निंजा हातोरीमधील कांजो हातोरी या कॅरेक्टरचा आवाज असो त्यांनी ते काम उत्कृष्टपणे निभावले आहे.

7/9
मंगला राजवाडे- नारळीकर – जयंत नारळीकर यांचे खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र इत्यादींमधील संशोधन आणि लेखन काय आहे हे आपल्याला माहित असेलच मात्र नारळीकरांच्या पत्नी मंगला यांचे गणित विषयातले काम उल्लेखनीय आहे. मंगला नारळीकर एक गणिततज्ञ आहेत. त्यांनी प्रगत गणितावर काम केले आहे.

8/9
शीला डावरे या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ऑटोरिक्षाचालक आहेत. त्यांनी सुमारे १३ वर्षे ऑटोरिक्षा चालविली व नंतर महिला ऑटोरिक्षा चालकांसाठी एक अकादमी सुरू केली. त्या परभणी जिल्ह्यात राहतात. त्यांना भारताचा फर्स्ट लेडी पुरस्कार मिळाला आहे.

9/9
नंदिनी निंबकर – मुळच्या फलटणच्या असणाऱ्या नंदिनी निंबकर या कृषी शास्त्रज्ञ आहेत. निंबकर ॲग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या(NARI) त्या अध्यक्ष आहेत. तीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी कृषी क्षेत्रात संशोधनाचे काम केले आहे.