1/9
शांता शेळके : शांता शेळके या मराठीतील प्रसिद्ध लेखिका, अनुवादक, गीतकार आणि कवयित्री आहेत. विविध साहित्य प्रकारात लेखन केलेल्या शांताबाईंचे खरं प्रेम राहिलं ते कवितेवरच. ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी...’ ही लावणी लिहिणाऱ्या त्या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत्या.

2/9
कविता महाजन : कविता महाजन त्यांच्या ‘ब्र’ या पहिल्या कादंबरीपासूनच चर्चेत आल्या. ‘ब्र’ या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आदिवासींच्या अनेक प्रश्नांना त्यांनी आपल्या लिखाणातून वाचा फोडली.

3/9
बहिणाबाई चौधरी: माझी माय सरसोती माले शिकविते बोली.... असे म्हणणाऱ्या बहिणाबाई खरेतर निरक्षर होत्या.मात्र त्यांच्याकडे काव्यरचनेची प्रतिभा होती. त्या अर्थाने त्या सरस्वतीची लेक होत्या. शेतकाम आणि घरकाम करताना बहिणाबाईंना उत्स्फुर्तपणे कविता सुचायच्या.बहिणाबाईंची मुलं त्या कविता लिहून काढायचे. बहिणाबाई जळगावच्या असल्याने त्यांच्या कविता,ओव्या आणि गाणी खान्देशी बोलीभाषेतील आहेत. त्यांचे ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर....’ हे गाणं  माहित नसलेला महाराष्ट्रातला एकही संसार नसेल.

4/9
शिरीष पै : आचार्य अत्रेंची कन्या असलेल्या शिरीष पै यांनी मराठी कथा, कविता, नाटक,ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यप्रकारात मोलाचे योगदान दिले आहे. हायकू हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार शिरीष पै यांनी  मराठीत आणला. नवयुग साप्ताहिक आणि दैनिक मराठासाठीचे त्यांचे काम एक लेखक, पत्रकार म्हणूनही आदर्शवत असेच आहे.

5/9
मंजिरी प्रभू : एक लेखिका , टीव्ही आणि चित्रपट निर्माती अशी मंजिरी प्रभू यांची ओळख आहे. त्यांच्या रहस्यमय काल्पनिक इंग्रजी लिखाणामुळे  त्यांना ‘देशी अगाथा ख्रिस्ती’ म्हटले जाते.

6/9
उर्मिला पवार : मराठी लेखिका, दलित आणि स्त्रीवादी चळवळीमध्ये आणि त्या संदर्भातल्या लिखाणाच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी उर्मिला पवार ओळखल्या जातात. एकांकिका, समीक्षा असे लेखनप्रकार हाताळणाऱ्या  उर्मिला पवार यांच्या 'आयदान ' या आत्मकथनाने मराठी साहित्यातील आत्मकथेला ऐतिहासिक वळण मिळाले. आज दलित आत्मकथनांच्या प्रवासाची चर्चा 'बलुतं’ ते ‘आयदान' अशीच केली जाते.  पवार यांच्या कथा, आत्मकथनाची इंग्रजी, स्वीडिश या भाषांमध्येही भाषांतरे झाली आहेत.

7/9
शोभा डे : एक लेखिका आणि स्तंभलेखिका अशी ओळख असलेल्या शोभा डे यांनी खरेतर आधी मॉडेलिंग क्षेत्रात करिअरची  सुरुवात केली होती. पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीयांच्या सांस्कृतिक- सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडित राहिल्याने त्यांच्या लेखनातूनही याच जीवनाचे चित्रण आढळते.

8/9
ट्विंकल खन्ना : ट्विंकल एक अभिनेत्री, इंटिरियर डिझायनर यासोबतच ट्विंकल एक इंग्रजी लेखिका म्हणूनही सर्वश्रुत आहे. तिचे ‘मिसेस फनीबोन्स’ हे पुस्तक बेस्टसेलर आहे.

9/9
रजनी बक्षी : भारतातील सामाजिक आणि राजकीय विषयांवर लिहिणाऱ्या रजनी बक्षी या मुंबईतील एक प्रसिद्ध लेखिका आणि पत्रकार म्हणून ओळखल्या जातात.