1/9
अंजली भागवत : 
ही एक व्यावसायिक भारतीय नेमबाज आहे. अंजलीला नेमबाजीच्या क्षेत्रामधे मानाचा समजला जाणारा ISSFचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा पुरस्कार २००२ साली म्युन्शेन येथे मिळाला. २००३ मध्ये मिलान येथे पैकी ३९९ गुण मिळवून तिने पहिला विश्वचषक जिंकला. तिने सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. सन २००० मध्ये सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ती अंतिम फेरीपर्यंत पोचली होती. कॉमनवेल्थ खेळामध्ये तिने १२ सुवर्ण व ४ रौप्य पदके जिंकली आहेत. १० मीटर एअर रायफल आणि स्पोर्ट्‌स 
रायफल ३ पी मध्ये तिचे कॉमनवेल्थ रेकॉर्ड आहे. २००३ मधील आफ्रो-आशियाई खेळांमध्ये, भागवतने अनुक्रमे क्रीडा ३ पी आणि एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला नेमबाज म्हणून आपले नाव कोरले आहे.
अंजली भागवत : ही एक व्यावसायिक भारतीय नेमबाज आहे. अंजलीला नेमबाजीच्या क्षेत्रामधे मानाचा समजला जाणारा ISSFचा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा पुरस्कार २००२ साली म्युन्शेन येथे मिळाला. २००३ मध्ये मिलान येथे पैकी ३९९ गुण मिळवून तिने पहिला विश्वचषक जिंकला. तिने सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. सन २००० मध्ये सिडनी येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ती अंतिम फेरीपर्यंत पोचली होती. कॉमनवेल्थ खेळामध्ये तिने १२ सुवर्ण व ४ रौप्य पदके जिंकली आहेत. १० मीटर एअर रायफल आणि स्पोर्ट्‌स रायफल ३ पी मध्ये तिचे कॉमनवेल्थ रेकॉर्ड आहे. २००३ मधील आफ्रो-आशियाई खेळांमध्ये, भागवतने अनुक्रमे क्रीडा ३ पी आणि एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला नेमबाज म्हणून आपले नाव कोरले आहे.
2/9
तेजस्विनी सावंत :
तेजस्विनीचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हारपुरात झाला. रायफल खरेदीसाठी तिला कर्जही घ्यावे लागले. दारिद्र्याचा प्रश्न असा होता की एकेकाळी तिने शुटिंग सोडण्याचे मनापासून पक्के केले होते. तिला खासगी कंपनीत नोकरी करून घरातील सदस्यांसह घरचे ओझे वाटून घ्यायचे होते. परंतु कुटुंबीयांनी, विशेषत: त्याच्या वडिलांनी तिचे मनोबल टिकविले. त्यानंतर त्याने शुटिंग सुरू ठेवले.जागतिक नेमबाजी स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिने ते वडिलांना समर्पित केले. २९ वर्षीय तेजस्विनीने रशियन नेमबाज मरीना बॉबकोवाच्या १२ वर्षांच्या रेकॉर्डची बरोबरी केली.
तेजस्विनी सावंत : तेजस्विनीचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हारपुरात झाला. रायफल खरेदीसाठी तिला कर्जही घ्यावे लागले. दारिद्र्याचा प्रश्न असा होता की एकेकाळी तिने शुटिंग सोडण्याचे मनापासून पक्के केले होते. तिला खासगी कंपनीत नोकरी करून घरातील सदस्यांसह घरचे ओझे वाटून घ्यायचे होते. परंतु कुटुंबीयांनी, विशेषत: त्याच्या वडिलांनी तिचे मनोबल टिकविले. त्यानंतर त्याने शुटिंग सुरू ठेवले.जागतिक नेमबाजी स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिने ते वडिलांना समर्पित केले. २९ वर्षीय तेजस्विनीने रशियन नेमबाज मरीना बॉबकोवाच्या १२ वर्षांच्या रेकॉर्डची बरोबरी केली.
3/9
राही सरनोबत :
जन्म ३० ऑक्टोबर १९९०, कोल्हापूर, महाराष्ट्र, एक भारतीय महिला नेमबाज. ५ एप्रिल २०१३ रोजी कोरिया येथील चांगवान मध्ये सुरू असलेल्या आईएसएसएफ विश्वकप चषक स्पर्धेत २५मीटर पिस्तुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थानिक नेमबाज केयोंग किम याचा ८-६ असा पराभव करत स्वर्णपदकाला गवसणी घातली. या विश्वकप स्पर्धेत ती सुवर्णपदक पटकवणारी पहिली भारतीय पिस्तुल नेमबाज ठरली. राहीने अमेरिकेत २०११ च्या आईएसएसएफ विश्वकप स्पर्धेत कास्यपदक पटकावले. कॉमनवेल्थ २०१० मध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावणाऱ्या राहीने आयएसएसएफ विश्वचषक, २०११ मध्ये कांस्यपदकासह ऑलिम्पिकचे तिकिटही मिळवले. लंडन ऑलिम्पिक्स २०१२ मध्ये राही भारतातील सर्वात कमी वयाची नेमबाज होती. २०१४ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात राही सरनोबतने आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले तर २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. २०१८ मधील आशियाई खेळात राहीने नेमबाजीच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत खेळाच्या रेकॉर्डसह भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. अशाप्रकारे आशियाई खेळात नेमबाजीत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडूचा विक्रम राहीच्या नावावर आहे. राही सरनोबतने शुटिंगच्या कारकीर्दीचा शुभारंभ कोल्हापूरच्या संभाजी राजे शुटिंग सेंटरमध्ये केला. राहीने पहिलेवहिले पदक युथ कॉमनवेल्थ गेम्स २००८ मध्ये पटकावले आहे.
राही सरनोबत : जन्म ३० ऑक्टोबर १९९०, कोल्हापूर, महाराष्ट्र, एक भारतीय महिला नेमबाज. ५ एप्रिल २०१३ रोजी कोरिया येथील चांगवान मध्ये सुरू असलेल्या आईएसएसएफ विश्वकप चषक स्पर्धेत २५मीटर पिस्तुल स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थानिक नेमबाज केयोंग किम याचा ८-६ असा पराभव करत स्वर्णपदकाला गवसणी घातली. या विश्वकप स्पर्धेत ती सुवर्णपदक पटकवणारी पहिली भारतीय पिस्तुल नेमबाज ठरली. राहीने अमेरिकेत २०११ च्या आईएसएसएफ विश्वकप स्पर्धेत कास्यपदक पटकावले. कॉमनवेल्थ २०१० मध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावणाऱ्या राहीने आयएसएसएफ विश्वचषक, २०११ मध्ये कांस्यपदकासह ऑलिम्पिकचे तिकिटही मिळवले. लंडन ऑलिम्पिक्स २०१२ मध्ये राही भारतातील सर्वात कमी वयाची नेमबाज होती. २०१४ च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये २५ मीटर एअर पिस्तुल प्रकारात राही सरनोबतने आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन करत सुवर्णपदक पटकावले तर २०१४ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. २०१८ मधील आशियाई खेळात राहीने नेमबाजीच्या २५ मीटर पिस्तुल स्पर्धेत खेळाच्या रेकॉर्डसह भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. अशाप्रकारे आशियाई खेळात नेमबाजीत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडूचा विक्रम राहीच्या नावावर आहे. राही सरनोबतने शुटिंगच्या कारकीर्दीचा शुभारंभ कोल्हापूरच्या संभाजी राजे शुटिंग सेंटरमध्ये केला. राहीने पहिलेवहिले पदक युथ कॉमनवेल्थ गेम्स २००८ मध्ये पटकावले आहे.
4/9
कविता राऊत - सावरपाडा एक्सप्रेस :
मूळ नाशिकची असलेली ३४ वर्षीय कविता राऊत ही लांब पल्ल्याची धावपटू आहे. दहा किलोमीटरचे अंतर केवळ ३४ मिनिटं ३२ सेकंदात पार करण्याचा राष्ट्रीय विक्रम तिच्या नावे जमा आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत वैयक्तिक पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला धावपटू ठरली होती. आदिवासी कुटुंबातून आलेल्या कविताचं यश देदीप्यमान आहे. ज्या पाड्यात ती लहानाची मोठी झाली, त्याच नावाची बिरुदावली तिला देण्यात आली आहे.
कविता राऊत - सावरपाडा एक्सप्रेस : मूळ नाशिकची असलेली ३४ वर्षीय कविता राऊत ही लांब पल्ल्याची धावपटू आहे. दहा किलोमीटरचे अंतर केवळ ३४ मिनिटं ३२ सेकंदात पार करण्याचा राष्ट्रीय विक्रम तिच्या नावे जमा आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत वैयक्तिक पदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला धावपटू ठरली होती. आदिवासी कुटुंबातून आलेल्या कविताचं यश देदीप्यमान आहे. ज्या पाड्यात ती लहानाची मोठी झाली, त्याच नावाची बिरुदावली तिला देण्यात आली आहे.
5/9
ललिता शिवाजी बाबर :
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या मोही या दुष्काळग्रस्त गावाची रहिवासी असलेल्या ललिताने हलाखीची परिस्थिती असतानाही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सुरुवातीला ५, तसेच १० हजार मीटर शर्यतीत आपले कसब दाखवले. नंतर अर्ध तसेच पूर्ण मॅरेथॉनमध्येही वरचष्मा प्रस्थापित केला. ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान तिला मिळाला. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानंतर तिने स्टिपलचेसमध्ये कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. रिओ ऑलिम्पिकमध्ये ती स्टिपलचेस शर्यतीत उतरली होती.
ललिता शिवाजी बाबर : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याच्या मोही या दुष्काळग्रस्त गावाची रहिवासी असलेल्या ललिताने हलाखीची परिस्थिती असतानाही दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सुरुवातीला ५, तसेच १० हजार मीटर शर्यतीत आपले कसब दाखवले. नंतर अर्ध तसेच पूर्ण मॅरेथॉनमध्येही वरचष्मा प्रस्थापित केला. ऑलिम्पिकमध्येही भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान तिला मिळाला. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानंतर तिने स्टिपलचेसमध्ये कारकीर्द करण्याचा निर्णय घेतला. रिओ ऑलिम्पिकमध्ये ती स्टिपलचेस शर्यतीत उतरली होती.
6/9
अभिलाषा म्हात्रे :
ही एक भारतीय व्यावसायिक कबड्डीपटू आहे आणि भारतीय राष्ट्रीय महिला कबड्डी संघाची कर्णधार होती. २०१५ मध्ये तिने भारत सरकारचा प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार जिंकला आहे . तिच्या उत्कृष्ट पाऊलांसाठी ओळखल्या जाणार्‍या तिला भारतातील कबड्डीपटूंपैकी एक मानले जाते. तिला
अभिलाषा म्हात्रे : ही एक भारतीय व्यावसायिक कबड्डीपटू आहे आणि भारतीय राष्ट्रीय महिला कबड्डी संघाची कर्णधार होती. २०१५ मध्ये तिने भारत सरकारचा प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार जिंकला आहे . तिच्या उत्कृष्ट पाऊलांसाठी ओळखल्या जाणार्‍या तिला भारतातील कबड्डीपटूंपैकी एक मानले जाते. तिला "कबड्डीची क्वीन" म्हणून प्रेमळपणे संबोधले जाते. २०१४ मध्ये इंचेऑन येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणार्‍या भारतीय कबड्डी संघाची ती सदस्य होती. २०१२ मध्ये पटना, भारत येथे झालेल्या कबड्डी विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाची देखील ती सदस्य होती.
7/9
स्मृती मंधाना :
ही डावखोरी सलामीवीर आहे. ‘नजाकत’ असलेले क्रिकेटमधील सर्व शॉट्स खेळते. ऑन साईड, ऑफ साईड दोन्हीबाजू तिची बलस्थाने आहेत. हूक पूल, ड्राइव्ज सर्व शॉट्स तिच्याकडे आहेत. शिवाय ती आक्रमक फलंदाजी करते. एक अत्यंत नम्र, हसमुख, जमिनीवर पाय असलेली फलंदाज ती आहे. तिच्या मुलाखती दरम्यानही तिची देहबोली अगदी नम्र, आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या खेळाडू प्रमाणे असते. तिने ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा मान मिळवला आहे. ती एक चांगली क्षेत्ररक्षकसुद्धा आहे. शारीरिक उंची लाभल्यामुळे ती सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सीमारेषेवर स्मृती मंधानाने अप्रतिम झेल पकडलेत आणि सुरेख क्षेत्ररक्षण केले होते. भारतीय महिला संघाची स्मृती मंधाना ही भविष्य आहे. पुढील कर्णधार तीच असणार आहे.
स्मृती मंधाना : ही डावखोरी सलामीवीर आहे. ‘नजाकत’ असलेले क्रिकेटमधील सर्व शॉट्स खेळते. ऑन साईड, ऑफ साईड दोन्हीबाजू तिची बलस्थाने आहेत. हूक पूल, ड्राइव्ज सर्व शॉट्स तिच्याकडे आहेत. शिवाय ती आक्रमक फलंदाजी करते. एक अत्यंत नम्र, हसमुख, जमिनीवर पाय असलेली फलंदाज ती आहे. तिच्या मुलाखती दरम्यानही तिची देहबोली अगदी नम्र, आणि क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटणाऱ्या खेळाडू प्रमाणे असते. तिने ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा मान मिळवला आहे. ती एक चांगली क्षेत्ररक्षकसुद्धा आहे. शारीरिक उंची लाभल्यामुळे ती सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षण करते. दक्षिण आफ्रिका दौऱ्यात सीमारेषेवर स्मृती मंधानाने अप्रतिम झेल पकडलेत आणि सुरेख क्षेत्ररक्षण केले होते. भारतीय महिला संघाची स्मृती मंधाना ही भविष्य आहे. पुढील कर्णधार तीच असणार आहे.
8/9
पूनम राऊत : 
पूनमने आजवर एका कसोटी सामन्यासह २८ महिला वनडे आणि २७ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. सिंधुदुर्गातील ती पहिली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटर ठरली आहे. पूनम राऊतचं मूळ गाव हे गडमठ राऊतवाडी. इंग्लंडमधील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत तिने ८६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने २१९ धावांचा डोंगर उभारुनही केवळ नऊ धावांनी झालेला पराभव पूनमसह तिच्या कुटुंबीयांच्याही जिव्हारी लागला होता.
पूनम राऊत : पूनमने आजवर एका कसोटी सामन्यासह २८ महिला वनडे आणि २७ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत. सिंधुदुर्गातील ती पहिली आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटर ठरली आहे. पूनम राऊतचं मूळ गाव हे गडमठ राऊतवाडी. इंग्लंडमधील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत तिने ८६ धावा केल्या होत्या. भारतीय संघाने २१९ धावांचा डोंगर उभारुनही केवळ नऊ धावांनी झालेला पराभव पूनमसह तिच्या कुटुंबीयांच्याही जिव्हारी लागला होता.
9/9
मोना मेश्राम : 
आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू. ही मूळची विदर्भातली. विश्वकप स्पर्धा आणि या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव अदभूत असल्याचे मोना सांगते. विश्‍वकप जिंकणे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. आमच्या सर्वांचीही हीच मनापासून इच्छा आहे. भारत महिला संघाने आतापर्यंत अनेक छोट्यामोठ्या स्पर्धा व मालिका जिंकल्या. पण आपला देश अजूनही विश्‍वविजेता होऊ शकला नाही याची खंत आहे. पण आगामी काळात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ शानदार कामगिरी करेल असा विश्वास आहे. 

आजच्या महिला क्रिकेटविषयी बोलताना मोना सांगते की, क्रिकेटमध्ये महिलांचा सहभाग अनेक वर्षांपासून आहे. मात्र अलीकडे महिला क्रिकेट सामन्यांची चर्चा होत आहे ही बाब आनंदाची आहे. अलीकडे विविध वाहिन्यांवर महिला क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण होत असल्याने आमच्या सारख्या खेळाडूंना प्रेक्षक नावाने ओळखतात ही आनंदाची बाब वाटते. इंग्लंडसोबत झालेल्या विश्वचषकातील अंतिम सामन्यामुळे आम्हा सर्वांना एक नवी ओळख मिळाली असून ही ओळख आपल्या कामगिरीने टिकवून ठेवण्याचे आमच्या सर्व खेळाडूंसमोरील आव्हान आहे.
मोना मेश्राम : आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू. ही मूळची विदर्भातली. विश्वकप स्पर्धा आणि या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव अदभूत असल्याचे मोना सांगते. विश्‍वकप जिंकणे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. आमच्या सर्वांचीही हीच मनापासून इच्छा आहे. भारत महिला संघाने आतापर्यंत अनेक छोट्यामोठ्या स्पर्धा व मालिका जिंकल्या. पण आपला देश अजूनही विश्‍वविजेता होऊ शकला नाही याची खंत आहे. पण आगामी काळात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ शानदार कामगिरी करेल असा विश्वास आहे. आजच्या महिला क्रिकेटविषयी बोलताना मोना सांगते की, क्रिकेटमध्ये महिलांचा सहभाग अनेक वर्षांपासून आहे. मात्र अलीकडे महिला क्रिकेट सामन्यांची चर्चा होत आहे ही बाब आनंदाची आहे. अलीकडे विविध वाहिन्यांवर महिला क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण होत असल्याने आमच्या सारख्या खेळाडूंना प्रेक्षक नावाने ओळखतात ही आनंदाची बाब वाटते. इंग्लंडसोबत झालेल्या विश्वचषकातील अंतिम सामन्यामुळे आम्हा सर्वांना एक नवी ओळख मिळाली असून ही ओळख आपल्या कामगिरीने टिकवून ठेवण्याचे आमच्या सर्व खेळाडूंसमोरील आव्हान आहे.