महाराष्ट्रात लग्नानंतर पहिली संक्रांत विवाहीत महिलेसाठी खूप महत्त्वाचा सण असतो. या सणासाठी महिला कित्येक दिवसापासून तयारी करत असतात. अशावेळी आपल्या मराठी कलाकार कसे मागे राहतील. अभिनेत्री अंकिता लोंखडेचं नुकतचं लग्न झालयं. या नव्या नवरीदेखील मोठ्या उत्साहात तिची पहिली संक्रांत साजरी केलीये. बघुया कुंटुंबिय आणि मित्र परिवारासोबत अंकीताने कशी साजरी केली तिची पहिली संक्रात.

अभिनेत्री अंकिता लोखंडेनंसुद्धा (Ankita Lokhande) लग्नानंतरची पहिली मकरसंक्रांत आपल्या कुटुंबासोबत आणि जवळच्या मैत्रिणीसोबत साजरी केली आहे. तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अंकिता लोखंडेच्या लग्नानंतरची ही पहिली संक्रांत होती. त्यामुळे हा सण तिच्यासाठी फारच खास होती. तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘कणभर तीळ मनभर प्रेम, गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला’…मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
अंकिताने काळया आणि लाल रंगाची पारंपरिक काठपदर साडी नेसली आहे. त्यावर हलव्याचे दागिने घातले घातले आहेत. आणि हातात हिरवागार चुडा आहे. या पारंपारिक लूकमध्ये अंकिता खूप सुंदर दिसत आहे.
अंकिताने कुंटुबियांसोबत अगदी मराठमोळ्या पद्धतीने सर्व चालीरीतींप्रमाणे तिची पहिली संक्रात साजरी केली.
अंकिता लोखंडेनं आपला बॉयफ्रेंड विकी जैनसोबत डिसेंबर 2021 मध्ये लग्न केलं. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अगदी राजेशाही थाटात या दोघांनी लग्नगाठ बांधली होती.
या दोघांच्या वेडिंग लूकचीसुद्धा मोठी चर्चा झाली होती.अभिनेत्रीने लग्नात मनीष मल्होत्राचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडेने संक्रातीचा सण उत्साहात साजरा केला. अंकिता लोखंडेच्या लग्नानंतरची ही पहिली संक्रांत होती. त्यामुळे हा सण तिच्यासाठी फारच खास होती.