1/12
सुधाकरपंत परिचारक :
सुधाकरपंत परिचारक यांचे १७ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले. ते महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पंचवीस वर्षे सदस्य होते. तर दिर्घकाळ महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. बंद पडलेल्या सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे सहकारातील डॉक्टर असे कायमच त्यांना संबोधले गेले. काँग्रेसमध्ये स्व.वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात होते. २०१९ सालच्या विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपा कडून लढवली होती.
सुधाकरपंत परिचारक : सुधाकरपंत परिचारक यांचे १७ ऑगस्ट २०२० रोजी निधन झाले. ते महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पंचवीस वर्षे सदस्य होते. तर दिर्घकाळ महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात देखील त्यांनी भरीव योगदान दिले. बंद पडलेल्या सहकारी कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे सहकारातील डॉक्टर असे कायमच त्यांना संबोधले गेले. काँग्रेसमध्ये स्व.वसंतदादा पाटील तर पुढे राष्ट्रवादीत शरद पवार यांचे निष्ठावंत म्हणून परिचारक यांच्याकडे पाहिले जात होते. २०१९ सालच्या विधानसभेची निवडणूक त्यांनी भाजपा कडून लढवली होती.
2/12
प्रणव मुखर्जी :
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे ३१ ऑगस्ट २०२० निधन झाले. हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भूषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी काही राजकीय कारणांमुळे त्यांना थोडंसं बाजूला करण्यात आलं. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्षही त्यांनी स्थापन केला होता. मात्र १९८९ नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर प्लानिंग कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये जेव्हा युपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.
प्रणव मुखर्जी : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे ३१ ऑगस्ट २०२० निधन झाले. हे भारताचे १३ वे राष्ट्रपती होते. राष्ट्रीय राजकारणात ते १९६९ पासून सक्रिय होते. भारतीय राजकारणातील अमूल्य सेवेसाठी त्यांना २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर ८ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात प्रणव मुखर्जी हे राजकारणात सक्रिय झाले होते. १९७३ मध्ये ते केंद्रीय मंत्रिमंडळात होते. १९८२ ते ८४ या काळात त्यांनी देशाचं अर्थमंत्रीपद भूषवलं. १९८० ते १९८५ या कालावाधीत राज्यसभेत ते लीडर ऑफ हाऊसही होते. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले. त्यावेळी काही राजकीय कारणांमुळे त्यांना थोडंसं बाजूला करण्यात आलं. त्यामुळे त्यावेळी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस हा पक्षही त्यांनी स्थापन केला होता. मात्र १९८९ नंतर त्यांनी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. १९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर प्लानिंग कमिशनच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात प्रणव मुखर्जी हे परराष्ट्र मंत्री होते. २००४ मध्ये जेव्हा युपीएचं सरकार आलं तेव्हाही ते मंत्रिमंडळात होते. २०१२ ते २०१७ या काळात ते भारताचे राष्ट्रपती होते.
3/12
जसवंत सिंह :
जसवंत सिंह यांचे २७ सप्टेंबर २०२० निधन झाले. भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक, केंद्रीय अर्थ, परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण अशी महत्त्वाची खाती
भूषविलेले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर चोहोबाजूने टीकेचा भडिमार होत असताना आपल्या कौशल्याने देशाची प्रतिमा उंचाविण्यात यशस्वी ठरले. भारतीय लष्करात मेजर ते राजकारणी असा त्यांचा प्रवास. सैनिकी पार्श्वभूमी असल्यानेच लष्करी सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला तरी अखेपर्यंत खांद्यावर सैनिकी गणवेशाच्या धर्तीवर स्कंधभूषण, हाताच्या बाह्या वळलेल्या असा सैनिकांसारखाच त्यांचा पोषाख असायचा. अर्थ, परराष्ट्र आणि संरक्षण ही केंद्रातील तीन महत्त्वाची खाती भूषविण्याची संधी मिळण्याचा योगही त्यांच्या वाट्याला आला होता. १९७०च्या दशकात लष्कराचा राजीनामा देऊन राजकारणप्रवेशाचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा त्यांचे राजकीय गुरू, माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांनी जनसंघात जाण्याचा सल्ला दिला. परंतु ‘अल्पसंख्याकांबाबतचीसंघाची तत्त्वे आपल्याला पटणारी नाहीत,’ अशी भूमिका मांडून ते दूर राहिले. पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी मैत्रीमुळे भाजप स्थापनेच्या वेळी ते १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १३ दिवसांच्या सरकारात अर्थखाते जसवंतसिंह यांच्याकडे सोपविण्यात आले होते. भाजपमध्ये तेव्हा रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेल्यांची महत्त्वाची पदांवर नियुक्ती केली जात असे. जसवंतसिंह यांच्याकडे ते पाठबळ नसले तरी वाजपेयी यांनी त्यांच्यावर नेहमीच महत्त्वाची जबाबदारी सोपविली व ती त्यांनी पारही पाडली. मते रोखठोक मांडण्याची सवय त्यांना अनेकदा भोवली होती. २००९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मदअली जिना यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात, फाळणीविषयी सरदार पटेल यांच्या विरोधात मांडलेली मते भाजप नेत्यांना फारच झोंबली होती.
जसवंत सिंह : जसवंत सिंह यांचे २७ सप्टेंबर २०२० निधन झाले. भाजपच्या संस्थापक सदस्यांपैकी एक, केंद्रीय अर्थ, परराष्ट्र व्यवहार आणि संरक्षण अशी महत्त्वाची खाती भूषविलेले आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतावर चोहोबाजूने टीकेचा भडिमार होत असताना आपल्या कौशल्याने देशाची प्रतिमा उंचाविण्यात यशस्वी ठरले. भारतीय लष्करात मेजर ते राजकारणी असा त्यांचा प्रवास. सैनिकी पार्श्वभूमी असल्यानेच लष्करी सेवेचा राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला तरी अखेपर्यंत खांद्यावर सैनिकी गणवेशाच्या धर्तीवर स्कंधभूषण, हाताच्या बाह्या वळलेल्या असा सैनिकांसारखाच त्यांचा पोषाख असायचा. अर्थ, परराष्ट्र आणि संरक्षण ही केंद्रातील तीन महत्त्वाची खाती भूषविण्याची संधी मिळण्याचा योगही त्यांच्या वाट्याला आला होता. १९७०च्या दशकात लष्कराचा राजीनामा देऊन राजकारणप्रवेशाचा निर्णय त्यांनी घेतला तेव्हा त्यांचे राजकीय गुरू, माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांनी जनसंघात जाण्याचा सल्ला दिला. परंतु ‘अल्पसंख्याकांबाबतचीसंघाची तत्त्वे आपल्याला पटणारी नाहीत,’ अशी भूमिका मांडून ते दूर राहिले. पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी मैत्रीमुळे भाजप स्थापनेच्या वेळी ते १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली १३ दिवसांच्या सरकारात अर्थखाते जसवंतसिंह यांच्याकडे सोपविण्यात आले होते. भाजपमध्ये तेव्हा रा. स्व. संघाची पार्श्वभूमी असलेल्यांची महत्त्वाची पदांवर नियुक्ती केली जात असे. जसवंतसिंह यांच्याकडे ते पाठबळ नसले तरी वाजपेयी यांनी त्यांच्यावर नेहमीच महत्त्वाची जबाबदारी सोपविली व ती त्यांनी पारही पाडली. मते रोखठोक मांडण्याची सवय त्यांना अनेकदा भोवली होती. २००९च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मदअली जिना यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात, फाळणीविषयी सरदार पटेल यांच्या विरोधात मांडलेली मते भाजप नेत्यांना फारच झोंबली होती.
4/12
5/12
केशुभाई पटेल :
केशुभाई पटेल यांचं २९ ऑक्टोबर २०२० रोजी निधन झालं. त्यांनी दोन वेळा गुजरातचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. १९९५ आणि १९९८ मध्ये ते मुख्यमंत्रीपदी 
विराजमान झाले होते. परंतु २००१ मध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दोन्ही वेळा त्यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. याव्यतिरिक्त त्यांनी गुजरातचं उपमुख्यमंत्रीपदही भूषवलं होतं. २००१ मध्ये केशुभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. २४ जुलै १९२८ मध्ये जुनागढ येथे केशुभाई पटेल यांचा जन्म झाला होता. त्यांनी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला होता. त्यानंतर जनसंघ आणि भाजपासोबत ते मोठ्या काळासाठी जोडले गेले होते. केशुभाई पटेल हे दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जात होते. गुजरात राज्यात भाजपाकडून पहिले मुख्यमंत्रीही तेच होते. काही कारणास्तव २०१२ मध्ये केशुभाई पटेल यांनी आपल्या गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना केली होती. परंतु दोन वर्षांतच त्यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलीन केला होता.
केशुभाई पटेल : केशुभाई पटेल यांचं २९ ऑक्टोबर २०२० रोजी निधन झालं. त्यांनी दोन वेळा गुजरातचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. १९९५ आणि १९९८ मध्ये ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते. परंतु २००१ मध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दोन्ही वेळा त्यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. याव्यतिरिक्त त्यांनी गुजरातचं उपमुख्यमंत्रीपदही भूषवलं होतं. २००१ मध्ये केशुभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली होती. २४ जुलै १९२८ मध्ये जुनागढ येथे केशुभाई पटेल यांचा जन्म झाला होता. त्यांनी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला होता. त्यानंतर जनसंघ आणि भाजपासोबत ते मोठ्या काळासाठी जोडले गेले होते. केशुभाई पटेल हे दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जात होते. गुजरात राज्यात भाजपाकडून पहिले मुख्यमंत्रीही तेच होते. काही कारणास्तव २०१२ मध्ये केशुभाई पटेल यांनी आपल्या गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना केली होती. परंतु दोन वर्षांतच त्यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलीन केला होता.
6/12
तरूण गोगोई :
तरूण गोगोई यांचे २३ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले. परदेशी घुसखोर, उल्फा बंडखोर, बोडो प्रश्न यामुळे धगधगणाऱ्या आसाममध्ये शांतता प्रस्थापित करण्यात गोगोई हे यशस्वी झाले. गोगोई यांच्या राजकीय कारकीर्दीलानगरपालिकेतून सुरुवात झाली; त्यानंतर १९७१ मध्ये ते थेट लोकसभेत निवडून गेले आणि पुढील तीन दशके ते दिल्लीच्या राजकारणातच स्थिरस्थावर झाले. आसामात तेव्हा हितेश्वर सैकिया हे काँग्रेसचे प्रभावी नेते होते व गोगोई यांना फार संधी मिळणेही शक्य नव्हते. यामुळे त्यांनी आसामपेक्षा दिल्लीलाच अधिक पसंती दिली. १९८५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाममध्ये शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने आसाम करार केला. आंदोलकच राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्यानंतर काँग्रेसला आसामची सत्ता गमवावी लागली आणि आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल कुमार महंत हे मुख्यमंत्री झाले. या काळात प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी गोगोई यांना मिळाली. आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणीवरून (एनआरसी) बराच वाद झाला. आसामचे उदाहरण समोर असल्यानेच राष्ट्रीय पातळीवर हा उपक्रम राबविण्यास विरोध होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोगोई यांच्या कार्यकाळातच ‘एनआरसी’चा कार्यक्रम सुरू झाला होता. पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीची तयारी वयाच्या ८६व्या वर्षी गोगोई यांनी सुरू केली होती. भाजपविरोधात आघाडय़ांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
तरूण गोगोई : तरूण गोगोई यांचे २३ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले. परदेशी घुसखोर, उल्फा बंडखोर, बोडो प्रश्न यामुळे धगधगणाऱ्या आसाममध्ये शांतता प्रस्थापित करण्यात गोगोई हे यशस्वी झाले. गोगोई यांच्या राजकीय कारकीर्दीलानगरपालिकेतून सुरुवात झाली; त्यानंतर १९७१ मध्ये ते थेट लोकसभेत निवडून गेले आणि पुढील तीन दशके ते दिल्लीच्या राजकारणातच स्थिरस्थावर झाले. आसामात तेव्हा हितेश्वर सैकिया हे काँग्रेसचे प्रभावी नेते होते व गोगोई यांना फार संधी मिळणेही शक्य नव्हते. यामुळे त्यांनी आसामपेक्षा दिल्लीलाच अधिक पसंती दिली. १९८५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आसाममध्ये शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने आसाम करार केला. आंदोलकच राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आल्यानंतर काँग्रेसला आसामची सत्ता गमवावी लागली आणि आसाम गण परिषदेचे प्रफुल्ल कुमार महंत हे मुख्यमंत्री झाले. या काळात प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व करण्याची संधी गोगोई यांना मिळाली. आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व पडताळणीवरून (एनआरसी) बराच वाद झाला. आसामचे उदाहरण समोर असल्यानेच राष्ट्रीय पातळीवर हा उपक्रम राबविण्यास विरोध होत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोगोई यांच्या कार्यकाळातच ‘एनआरसी’चा कार्यक्रम सुरू झाला होता. पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या आसाम विधानसभा निवडणुकीची तयारी वयाच्या ८६व्या वर्षी गोगोई यांनी सुरू केली होती. भाजपविरोधात आघाडय़ांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
7/12
अहमद पटेल :
अहमद पटेल यांचं २५ नोव्हेंबर २०२० निधन झाले. अहमद पटेल पक्षाचा एक स्तंभ होते. त्यांना सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असेच संबोधण्यात येई. ते संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये जगले. जेव्हा काँग्रेस पक्ष खडतर काळातून जात होता, तेव्हाही ते पक्षासोबत उभे राहिले. ते एखाद्या मौल्यवान संपत्तीसारखे होते. अहमद पटेल तीन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले होते. त्याचबरोबर पाच वेळा राज्यसभेचे खासदार होते. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांच्यावर पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. १९७७ मध्ये अवघ्या २६ वर्षी ते भरूच लोकसभा मतदारसंघातून संसदेत पोहोचले होते. कायम पडद्यामागे राहून काम करणाऱ्या अहमद पटेल यांचं पक्षामध्ये मोठं वजन होतं. गांधी कुटुंबांच्या विश्वासातील नेत्यांमध्ये त्यांचं नावं घेतलं जायचं.
अहमद पटेल : अहमद पटेल यांचं २५ नोव्हेंबर २०२० निधन झाले. अहमद पटेल पक्षाचा एक स्तंभ होते. त्यांना सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असेच संबोधण्यात येई. ते संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये जगले. जेव्हा काँग्रेस पक्ष खडतर काळातून जात होता, तेव्हाही ते पक्षासोबत उभे राहिले. ते एखाद्या मौल्यवान संपत्तीसारखे होते. अहमद पटेल तीन वेळा लोकसभेचे सदस्य राहिले होते. त्याचबरोबर पाच वेळा राज्यसभेचे खासदार होते. ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांच्यावर पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. १९७७ मध्ये अवघ्या २६ वर्षी ते भरूच लोकसभा मतदारसंघातून संसदेत पोहोचले होते. कायम पडद्यामागे राहून काम करणाऱ्या अहमद पटेल यांचं पक्षामध्ये मोठं वजन होतं. गांधी कुटुंबांच्या विश्वासातील नेत्यांमध्ये त्यांचं नावं घेतलं जायचं.
8/12
भारत भालके :
भारत भालके (नाना) यांचे २९ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले. पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावातील एका शेतकरी कुटुंबात भालके यांचा जन्म झाला. लहान वयापासूनच त्यांना कुस्तीचे वेड होते. पुढे कोल्हापूरच्या लाल मातीत पैलवानकीचे डावपेच शिकलेले भालके यांनी त्यांची राजकीय कारकीर्द विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाबरोबर सुरू केली. पुढे ते याच कारखान्याचे अध्यक्ष झाले. त्यानंतर भालके यांनी सुधाकरपंत परिचारक यांच्या विरोधात पंढरपूर मतदार संघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली. मात्र यात भालके यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ साली पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या वेळी त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव केला. पुढे २०१४ च्या मोदी लाटेतही काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांचा पराभव केला. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत त्यांनी माजी आ. सुधाकर परिचारक यांचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली होती. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली. मंगळवेढा येथील ३५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.
भारत भालके : भारत भालके (नाना) यांचे २९ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले. पंढरपूर तालुक्यातील सरकोली गावातील एका शेतकरी कुटुंबात भालके यांचा जन्म झाला. लहान वयापासूनच त्यांना कुस्तीचे वेड होते. पुढे कोल्हापूरच्या लाल मातीत पैलवानकीचे डावपेच शिकलेले भालके यांनी त्यांची राजकीय कारकीर्द विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाबरोबर सुरू केली. पुढे ते याच कारखान्याचे अध्यक्ष झाले. त्यानंतर भालके यांनी सुधाकरपंत परिचारक यांच्या विरोधात पंढरपूर मतदार संघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली. मात्र यात भालके यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ साली पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या वेळी त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव केला. पुढे २०१४ च्या मोदी लाटेतही काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधान परिषद सदस्य प्रशांत परिचारक यांचा पराभव केला. तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत त्यांनी माजी आ. सुधाकर परिचारक यांचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक नोंदवली होती. शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांवर त्यांनी आंदोलने केली. मंगळवेढा येथील ३५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला.
9/12
विष्णु सावरा :
विष्णु सावरा यांचे ९ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. १९८० मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून ते भारतीय जनता पक्षाचे
पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत झाले. १९८० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने वाडा मतदार संघात उमेदवारी दिली. मात्र या
निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाकडून पुन्हा वाडा मतदार संघातून निवडणूक लढवली. यावेळीही त्यांचा निसटता पराभव झाला. दोन वेळा पराभव पत्करुनही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले होते. संवेदनशील, जागृत, कर्तव्यदक्ष अशी त्यांची ओळख होती. सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपाने वाडा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी दिली. यावेळी मात्र त्यांनी विजय प्राप्त करुन आमदारहोण्याचे स्वप्न पूर्ण केले. या निवडणुकी नंतर झालेल्या सन २०१४ पर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवून सातत्याने सहावेळा विजयी होण्याचा सन्मान मिळविला.सन १९९५ च्या युती सरकारच्या काळात त्यांना शेवटच्या टप्प्यात १ फेब्रुवारी १९९९ रोजी आदिवासी विकास मंत्री होण्याचा मान मिळाला. अवघे सहा महिने मिळालेल्या मंत्रीपदातून त्यांनी अनेक विकासाची कामे केली.राज्यातील शंभरहून अधिक आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतला. विक्रमगड तालुक्याची निर्मिती, वाडा येथील २२० के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र, वाडा एसटी आगाराची निर्मिती, वाडा, विक्रमगड मध्ये आयटीआय कॉलेज, निंबवली, केळठण, तिळसा, ब्राम्हणगांव, उंबरखांड, शिरगाव येथील पुलांची कामे अशा अनेक कामांसोबत आदिवासी भागात प्रत्येक गावाला जोडणा-या रस्त्यांचे डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या योजना, समाजगृहे अशी अनेक कामे त्यांनी केली. सन २०१४ मध्ये भाजपा सरकारमध्ये त्यांच्यावर पुन्हा आदिवासी विकास खात्याच्या मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री होण्याचाही त्यांना सन्मान मिळाला. दांडगी स्मरणशक्ती असलेले विष्णु सवरा हे त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, सामान्य माणसाला ते नावानिशी ओळखत असत. त्यांच्या गोड वाणीने वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांचे परिचित झाले होते. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने एक अजातशत्रू लोकप्रतिनिधी अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती.
विष्णु सावरा : विष्णु सावरा यांचे ९ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. १९८० मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मधील मोठ्या पगाराची नोकरी सोडून ते भारतीय जनता पक्षाचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्यरत झाले. १९८० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने वाडा मतदार संघात उमेदवारी दिली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाकडून पुन्हा वाडा मतदार संघातून निवडणूक लढवली. यावेळीही त्यांचा निसटता पराभव झाला. दोन वेळा पराभव पत्करुनही त्यांनी आपले सामाजिक कार्य सुरुच ठेवले होते. संवेदनशील, जागृत, कर्तव्यदक्ष अशी त्यांची ओळख होती. सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपाने वाडा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी दिली. यावेळी मात्र त्यांनी विजय प्राप्त करुन आमदारहोण्याचे स्वप्न पूर्ण केले. या निवडणुकी नंतर झालेल्या सन २०१४ पर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवून सातत्याने सहावेळा विजयी होण्याचा सन्मान मिळविला.सन १९९५ च्या युती सरकारच्या काळात त्यांना शेवटच्या टप्प्यात १ फेब्रुवारी १९९९ रोजी आदिवासी विकास मंत्री होण्याचा मान मिळाला. अवघे सहा महिने मिळालेल्या मंत्रीपदातून त्यांनी अनेक विकासाची कामे केली.राज्यातील शंभरहून अधिक आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतला. विक्रमगड तालुक्याची निर्मिती, वाडा येथील २२० के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र, वाडा एसटी आगाराची निर्मिती, वाडा, विक्रमगड मध्ये आयटीआय कॉलेज, निंबवली, केळठण, तिळसा, ब्राम्हणगांव, उंबरखांड, शिरगाव येथील पुलांची कामे अशा अनेक कामांसोबत आदिवासी भागात प्रत्येक गावाला जोडणा-या रस्त्यांचे डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या योजना, समाजगृहे अशी अनेक कामे त्यांनी केली. सन २०१४ मध्ये भाजपा सरकारमध्ये त्यांच्यावर पुन्हा आदिवासी विकास खात्याच्या मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री होण्याचाही त्यांना सन्मान मिळाला. दांडगी स्मरणशक्ती असलेले विष्णु सवरा हे त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, सामान्य माणसाला ते नावानिशी ओळखत असत. त्यांच्या गोड वाणीने वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांचे परिचित झाले होते. सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने एक अजातशत्रू लोकप्रतिनिधी अशी त्यांनी ओळख निर्माण केली होती.
10/12
मोहन रावले : ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक
मोहन रावले यांचे १९ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून ते दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय होते. रावले हे गोव्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. अत्यंत साधीराहणी असणाऱ्या रावले यांचा संपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते. ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. विनम्र श्रद्धांजली…”, असं ट्विट करत संजय राऊतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मोहन रावले यांची ओळख ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक अशी होती. ते कडवट शिवसैनिक होते. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात मोहन रावले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
मोहन रावले : ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक मोहन रावले यांचे १९ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून ते दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय होते. रावले हे गोव्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. अत्यंत साधीराहणी असणाऱ्या रावले यांचा संपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते. ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. विनम्र श्रद्धांजली…”, असं ट्विट करत संजय राऊतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मोहन रावले यांची ओळख ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक अशी होती. ते कडवट शिवसैनिक होते. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात मोहन रावले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
11/12
मा.गो. वैद्य :
मा.गो. वैद्य यांचे १९ डिसेंबर २०२० रोजी निधन झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजवरच्या सहाही सरसंघचालकांबरोबर काम करणारे, संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या अनुशासनबद्ध संस्कारांत घडलेले माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य हे संघाच्या चौकटीत वावरूनही सामाजिक व्यवहारात उदारमतवादी राहिले. त्यांना हे कसे साधते, असा प्रश्न संघातील त्यांच्या निकटवर्तीयांना व संघाबाहेरच्या मंडळींनाही कायम पडत असे. संघाचे प्रवक्ते असतानाही त्यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात काही तरी वेगळे करून दाखवण्याची धडाडी दिसली, तर कधी देशहितास्तव काँग्रेससारख्या विरोधी पक्षाचे अस्तित्व टिकलेच पाहिजे अशी भूमिकाही ते उघडपणे मांडत राहिले. १९५४-५५ साली प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधीलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ  नये, असा सरकारी आदेश आला. तो वैद्य यांनी निडरपणे नाकारला. आपल्या अंगी जे जे काही चांगले आणि समाजहिताचे आहे ते समाजाच्या कामी यावे, ही त्यांची धारणा होती आणि त्याच धारणेने त्यांनी ‘आपली संस्कृती’, ‘चांदणे प्रतिभेचे’, ‘ठेवणीतले संचित’, ‘मेरा भारत महान’ आदी पुस्तकांचे लेखन केले. ऐंशीच्या दशकाच्या शेवटाकडे महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी सभागृह गाजवले. वयाच्या नव्वदीतही त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी फारच सकारात्मक होती. वैद्य यांचे चाहते त्यांच्या शंभराव्या वाढदिवसाची विशेष तयारी करीत होते, परंतु ही तयारी मूर्त रूपात पोहोचण्याआधीच वयाच्या ९७व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.संघविचाराधिष्ठित एका दैनिकाचे संपादकपद सांभाळत असतानाच संघविरोधासाठी ओळखल्या जाणाऱ्या लेखक-विचारवंतांचेही लेख त्यात प्रसिद्ध करण्याचे ‘कालातीत औदार्य’ वैद्य यांनी दाखवले. १९६६ पासून मा. गो. वैद्य यांनी पत्रकारिता सुरु केली होती. अनेक उत्कृष्ट लेख, अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहणाऱ्या वैद्य यांना पत्रकारिता आणि समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारं सुगम संघ नावाचं हिंदी पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं.
मा.गो. वैद्य : मा.गो. वैद्य यांचे १९ डिसेंबर २०२० रोजी निधन झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजवरच्या सहाही सरसंघचालकांबरोबर काम करणारे, संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या अनुशासनबद्ध संस्कारांत घडलेले माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य हे संघाच्या चौकटीत वावरूनही सामाजिक व्यवहारात उदारमतवादी राहिले. त्यांना हे कसे साधते, असा प्रश्न संघातील त्यांच्या निकटवर्तीयांना व संघाबाहेरच्या मंडळींनाही कायम पडत असे. संघाचे प्रवक्ते असतानाही त्यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यात काही तरी वेगळे करून दाखवण्याची धडाडी दिसली, तर कधी देशहितास्तव काँग्रेससारख्या विरोधी पक्षाचे अस्तित्व टिकलेच पाहिजे अशी भूमिकाही ते उघडपणे मांडत राहिले. १९५४-५५ साली प्राध्यापकांनी कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधीलकी ठेवू नये किंवा निवडणुकीत भाग घेऊ नये, असा सरकारी आदेश आला. तो वैद्य यांनी निडरपणे नाकारला. आपल्या अंगी जे जे काही चांगले आणि समाजहिताचे आहे ते समाजाच्या कामी यावे, ही त्यांची धारणा होती आणि त्याच धारणेने त्यांनी ‘आपली संस्कृती’, ‘चांदणे प्रतिभेचे’, ‘ठेवणीतले संचित’, ‘मेरा भारत महान’ आदी पुस्तकांचे लेखन केले. ऐंशीच्या दशकाच्या शेवटाकडे महाराष्ट्र विधान परिषद सदस्य म्हणून त्यांनी सभागृह गाजवले. वयाच्या नव्वदीतही त्यांची जीवनाकडे पाहण्याची दृष्टी फारच सकारात्मक होती. वैद्य यांचे चाहते त्यांच्या शंभराव्या वाढदिवसाची विशेष तयारी करीत होते, परंतु ही तयारी मूर्त रूपात पोहोचण्याआधीच वयाच्या ९७व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.संघविचाराधिष्ठित एका दैनिकाचे संपादकपद सांभाळत असतानाच संघविरोधासाठी ओळखल्या जाणाऱ्या लेखक-विचारवंतांचेही लेख त्यात प्रसिद्ध करण्याचे ‘कालातीत औदार्य’ वैद्य यांनी दाखवले. १९६६ पासून मा. गो. वैद्य यांनी पत्रकारिता सुरु केली होती. अनेक उत्कृष्ट लेख, अग्रलेख, विविध विषयांवर भाष्य लिहणाऱ्या वैद्य यांना पत्रकारिता आणि समाजसेवेचे अनेक पुरस्कार मिळाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची माहिती देणारं सुगम संघ नावाचं हिंदी पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं.
12/12
मोतीलाल वोरा :
मोतीलाल वोरा यांचे २१ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. मोतीलाल वोरा यांनी बरीच वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम केले आणि बर्या च वर्तमानपत्रांचे प्रतिनिधित्व केले. मोतीलाल वोरा १९६८ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी १९७० साली मध्यप्रदेशातून विधानसभोची निवडणूक लढवली आणि त्यात त्यांना विजयही मिळाला. त्यांनी राज्य रस्ते परिवहन मंडळाचे उपाध्यक्षपदही भूषवले. १९७७ आणि १९८० मध्ये दोन वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. आणि १९८० मध्ये अर्जुन सिंह यांच्या मंत्रीमंडळात शिक्षण खात्याचा भार सोपविला. मोतीलाल वोरा १९८३ मध्ये कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर त्यांची मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.१३ फेब्रुवारी १९८५ मध्ये मोतीलाल वोरा हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. १३ फेब्रुवारी १९८८ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामादिला. १४ फेब्रुवारी १९८८ मध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य कुटुंब कल्याण आणि नागरी उड्डाण मंत्रालयाची धुरा सांभाळली. एप्रिल १९८८ मध्ये मोतीलाल वोरामध्यप्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले. २६ मे १९९३ ते ३ मे १९९६ पर्यंत ते उत्तरप्रदेशचे राज्यपाल होते.
वोरा नॅशनल हेराल्ड केस: असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL), यंग इंडियन अँड ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटी (एआयसीसी) या तीन संस्थांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. मोतीलाल वोरा २२ मार्च २०२ रोजी एजेएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक झाले. यापूर्वी त्यांनी एआयसीसी कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. याशिवाय मोतीलाल वोरा १२% भागधारक आणि युवा भारतीय मार्गदर्शक देखील राहिले आहेत.
मोतीलाल वोरा : मोतीलाल वोरा यांचे २१ डिसेंबर २०२० रोजी निधन झाले. मोतीलाल वोरा यांनी बरीच वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात काम केले आणि बर्या च वर्तमानपत्रांचे प्रतिनिधित्व केले. मोतीलाल वोरा १९६८ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यांनी १९७० साली मध्यप्रदेशातून विधानसभोची निवडणूक लढवली आणि त्यात त्यांना विजयही मिळाला. त्यांनी राज्य रस्ते परिवहन मंडळाचे उपाध्यक्षपदही भूषवले. १९७७ आणि १९८० मध्ये दोन वेळा ते विधानसभेवर निवडून गेले. आणि १९८० मध्ये अर्जुन सिंह यांच्या मंत्रीमंडळात शिक्षण खात्याचा भार सोपविला. मोतीलाल वोरा १९८३ मध्ये कॅबिनेट मंत्री झाले. त्यानंतर त्यांची मध्य प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली.१३ फेब्रुवारी १९८५ मध्ये मोतीलाल वोरा हे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री झाले. १३ फेब्रुवारी १९८८ मध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामादिला. १४ फेब्रुवारी १९८८ मध्ये केंद्र सरकारच्या आरोग्य कुटुंब कल्याण आणि नागरी उड्डाण मंत्रालयाची धुरा सांभाळली. एप्रिल १९८८ मध्ये मोतीलाल वोरामध्यप्रदेशमधून राज्यसभेवर निवडून आले. २६ मे १९९३ ते ३ मे १९९६ पर्यंत ते उत्तरप्रदेशचे राज्यपाल होते. वोरा नॅशनल हेराल्ड केस: असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL), यंग इंडियन अँड ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटी (एआयसीसी) या तीन संस्थांमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. मोतीलाल वोरा २२ मार्च २०२ रोजी एजेएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक झाले. यापूर्वी त्यांनी एआयसीसी कोषाध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. याशिवाय मोतीलाल वोरा १२% भागधारक आणि युवा भारतीय मार्गदर्शक देखील राहिले आहेत.