1/7
प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यात ३२ व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान अंतर्गत ठाणे व मुंबई वाहतूक पोलीस तसेच रेमंड यांच्या संयुक्त विद्यमाने व्हिंटेज कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार रॅलीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही अनुभवली व्हिंटेज कार राईड

2/7
आतापर्यंत केवळ नावच ऐकलेल्या मॅकलरेन, फेरारी, लॅम्बोर्गिनी, रोल्स रॉयस, बेन्टले, अल्विस, डॉडज ब्यूइक, कॅडिलॅक, फोर्ड, हडसन यासारख्या नामवंत गाड्या आणि ट्रिम्फ, बीएसए, हार्ले डेव्हिडसन, रॉयल एन्फिल्ड यासारख्या मोटारसायकली याचि देही याचि डोळा पाहण्याची संधी ठाणेकरांना प्रजासत्ताक दिनी मिळाली.

3/7
राज्याचे नगरविकास तसेच सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री आिण ठाणे तसेच गडचिरोली जिल्ह्यांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील ही ह्यव्हिंटेज कार राईड अनुभवली.

4/7
या कार्यक्रमप्रसंगी रेमंडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोविड संसर्ग होऊ नये यासाठी संपूर्ण सुरक्षेचे पालन केले गेले हे विशेष आहे.

5/7
वांद्रे कुर्ला संकुलातून सुरु झालेल्या या सुपर कार ड्राइव्हची सांगता ठाण्यातील रेमंड मैदानावर झाली. त्यानंतर ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला.

6/7
रेमंड तर्फे राबविण्यात आलेल्या या रस्ते सुरक्षा अभियानाचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी कौतुक केले. 
या उपक्रमाबद्दल बोलताना गौतम सिंघानिया यांनी सांगितले, एक मोटरप्रेमी म्हणून मला असे वाटते की, व्हीसीसीसीआय आणि मुंबई व ठाणे पोलिसांच्या सहयोगाने रिपब्लिक सेफ्टी ड्राइव्हचे आयोजन करण्यासाठी आपल्या देशाच्या ७२व्या प्रजासत्ताक दिनापेक्षा अधिक चांगला दिवस दुसरा कोणताच असू शकत नाही.
रेमंड तर्फे राबविण्यात आलेल्या या रस्ते सुरक्षा अभियानाचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी कौतुक केले. या उपक्रमाबद्दल बोलताना गौतम सिंघानिया यांनी सांगितले, एक मोटरप्रेमी म्हणून मला असे वाटते की, व्हीसीसीसीआय आणि मुंबई व ठाणे पोलिसांच्या सहयोगाने रिपब्लिक सेफ्टी ड्राइव्हचे आयोजन करण्यासाठी आपल्या देशाच्या ७२व्या प्रजासत्ताक दिनापेक्षा अधिक चांगला दिवस दुसरा कोणताच असू शकत नाही.
7/7
कार व मोटरप्रेमी या रॅलीत अतिशय उत्साहाने सहभागी झाले आणि हा उपक्रम खास बनवला याचा आम्हाला अतिशय आनंद आहे.  सुरक्षित अंतर राखून ज्यांनी ही परेड पाहिली त्यांच्यासाठी देखील हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला असेल असेही सिंघानिया यावेळी म्हणाले