काळ्या रंगाची पैठणी, नाकात नथ, मराठमोळा साज करत अप्सराने दिल्या संक्रातीच्या शुभेच्छा

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असते. आणि ती बऱ्याचदा फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकत्याच तिने पोस्ट केलेल्या डान्स रिल्सला फॅन्सची खूप पसंती मिळताना दिसत आहे.

  अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)विविध भूमिका साकारून नेहमीच प्रेक्षकांच मनोरंजन करत असते. लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाली मकर संक्रांत साजरी करत आहे. काळ्या रंगाच्या साडी परिधान करत खास अंदाजात तिने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

  फोटोत सोनालीने काळ्या रंगाची पैठणी नेसली आहे. या काळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुलुन दिसत आहे. या साडीवर तिने मराठमोळा साज केला आहे. नाकात नथ, हातात ऑक्साईडमध्ये कंडे, गळ्यात नेकलेस, कानात झुमके सोनाली या लुकमध्ये खुपच सुंदर दिसत आहे.

   

  ‘सूर्याचे तेज मकरसंक्रमणानंतर वाढत जाते तसेच आपले पण तेज (यश, किर्ती) वाढती असो… असे म्हणत तिने सर्वांना मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

   

  सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असते. आणि ती बऱ्याचदा फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकत्याच तिने पोस्ट केलेल्या डान्स रिल्सला फॅन्सची खूप पसंती मिळताना दिसत आहे.

   

  चाहत्यांनाही सोनालीचा हा मराठमोळा लूक आवडला असून तिच्या पोस्टवर कंमेट्सचा पाऊस पडत आहे. “गॅार्जिअस तर कुणी सौंदर्याचा खजिना असे कमेंट्स करत सोनालीच्या लूकची प्रंशसा केली आहे.

   

  सोनाली कुलकर्णीचा पांडू चित्रपट नुकताच रिलीज झाला. तिने यामध्ये उषाची भूमिका साकारली आहे. याशिवाय सोनाली झिम्मा चित्रपटात झळकली आहे. याशिवाय ति आता क्रांती रेडकरच्या रेनबो चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.