सणसमारंभाच्या दिवशी किंवा इतर वेळी महिला छान साडी नेसून तयार होतात. साडी नेसल्यानंतर त्यावर मॅचिंग होणारे कानातले, गळ्यातलं, बांगड्या आणि इतर सुंदर दागिने परिधान केले जातात. पण नेहमी नेहमी साडी नेसल्यानंतर त्यावर नेमक्या कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी महिला एकत्र सोन्याच्या बांगड्या घालतात किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला साडीच्या रंग आणि पद्धतीनुसार साडीवर कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य-pinterest)
कोणत्या साडीवर शोभून दिसतील कोणत्या बांगड्या? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

खणाची किंवा चंदेरी काठ असलेली साडी नेसल्यानंतर त्यावर ऑक्साईड बांगड्या घालाव्यात. यामुळे हात आणखीनच उठावदार आणि सुंदर दिसतात.

तुम्हाला जर जास्त हेवी डिझाईन असलेल्या बांगड्या परिधान करायला आवडत नसतील तर तुम्ही या पद्धतीच्या साध्या बांगड्या हातामध्ये घालू शकता.

साडीवरील प्रिंटला किंवा ब्लॉऊजला मॅच होतील अशा जास्त हेवी नसलेल्या बांगड्या कोणत्याही साडीवर खूप सुंदर दिसतात.

साडीच्या रंगानुसार बांगड्या परिधान केल्यास लुक सुंदर दिसत नाही. त्यामुळे साडी असलेल्या रंगाच्या बांगड्या परिधान करू नये.

काठापदराची किंवा पैठणी साडी नेसल्यानंतर त्यावर हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालाव्यात. या बांगड्या हातामध्ये खूप सुंदर आणि उठावदार दिसतात.






