थंडीत फाटलेल्या पायांच्या भेगांपासून आराम मिळवण्यासाठी करून पहा 'हे' घरगुती उपाय
खोबऱ्याच्या तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे पायांची त्वचा हायड्रेट राहते. यासाठी खोबऱ्याच्या तेलात मीठ मिक्स करून पायांवर लावावे. यामुळे डेड स्किन कमी होऊन पाय मुलायम होतात.
मध एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आणि अँटीबॅक्टेरियल पदार्थ आहे. त्यामुळे मधात दूध मिक्स करून पायांवर लावल्यास दोन दिवसांमध्ये पायांची त्वचा अतिशय मुलायम आणि सॉफ्ट होईल.
त्वचेच्या समस्या उद्भवल्यानंतर कायमच घरगुती उपाय करावेत. केळीचा फेसपॅक तयार करून पायांवर लावून काहीवेळ तसाच ठेवावा. यामुळे पाय सॉफ्ट आणि मुलायम होतील.
गुलाब पाण्याचा वापर केल्यामुळे त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो आणि त्वचा अधिक सुंदर दिसते. यासाठी रात्री झोपण्याआधी गुलाब पाणी पायांवर लावून ठेवावे.
हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. वाटीमध्ये हळद घेऊन त्यात दुधाच्या वरील साय टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण पायांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे पायांच्या भेगा भरतील.