Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगामी निवडणुकीसाठी राज्यात महायुती; नगरपालिकेची निवडणूक होणार अधिक चुरशीची

राज्यात महायुतीची सत्ता, पंढरपूरात काय? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहिल्याने महायुतीतल्याच मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आजतरी स्वतंत्र राजकीय चूल मांडली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 14, 2025 | 03:08 PM
आगामी निवडणुकीसाठी राज्यात महायुती; नगरपालिकेची निवडणूक होणार अधिक चुरशीची

आगामी निवडणुकीसाठी राज्यात महायुती; नगरपालिकेची निवडणूक होणार अधिक चुरशीची

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : राज्यात महायुतीची सत्ता, पंढरपूरात काय? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहिल्याने महायुतीतल्याच मित्र पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी आजतरी स्वतंत्र राजकीय चूल मांडली आहे. यामुळे येथील नगरपालिकेची आगामी निवडणूक अधिक चुरशीची होईल, असे दिसते आहे. आरक्षण सोडत जाहीर होण्याच्या आधीच पालिकेच्या निवडणुकीची उत्सुकता लागलेल्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपापल्या परीने जनसंपर्क वाढविला आणि पालिकेच्या निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर होताच पक्षप्रमुख अधिक सक्रिय झाले.

शहरातील राजकीय धुरंधर म्हटले जाणारे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्यातला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. यामुळे राज्यात महायुतीची सत्ता, पंढरपूरात काय? हा प्रश्न अधिक चर्चेत आला आहे. राज्यात मित्रपक्ष म्हणून सत्तेत असले तरी पंढरपुरात या आजी-माजी आमदारांची मैत्री होईल का? याबद्दल अनेकांमध्ये साशंकता आहे. या सगळ्याच घटनांच्या अनुषंगाने स्थानिक राजकीय पटलावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार गट आणि शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांच्याही गोटात सध्या संभ्रमाचे वातावरण दिसते आहे.

हेदेखील वाचा : Local Body Election: गुहागरात महाविकास आघाडीची यादी जाहीर; जिल्ह्यात महायुतीची घोषणा मात्र अद्याप…

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातर्फे खास सुकानी समिती निर्माण करण्यात आली असून या समितीचे सदस्य कल्याणराव काळे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या समितीत काळे यांच्यासह शहरात प्रभाव असलेले अन्य नेते आहेत.

भाजपने विधानसभा निवडणुकीत धार्मिक मुद्दे पुढे केल्याने साहजिकच प्रभाव असलेला भाग अधिक मजबूत करण्यासाठी भाजपाने संधी सोडलेली नाही. माजी आमदार प्रशांत परिचारक यांना पद देऊन त्यांच्या नेतृत्वाला महत्व देणे हा त्याचाच एक भाग आहे. परिचारक हे त्यांच्या प्रभावाखालील भागातून पक्षाला बळकटी मिळवून देऊ शकतील अशी तजवीज पक्ष नेत्यांनी केली आहे.

शिवसेना शिंदे गटाची अवस्था आणखीनच पाहण्यासारखी आहे. या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सोलापूरसाठी दिलेले तीन तीन जिल्हाध्यक्ष आणि या सर्वांचेच मुख्यालय सोलापूर शहर आहे. यामुळे पंढरपूर शहरात नेमक्या कोणत्या जिल्हाध्यक्षांचा किती प्रभाव असणार आहे हे पाहिले जाणार आहे. पैकी जिल्हा संपर्कप्रमुख महेश साठे यांनी सोलापूर जिल्ह्यातील आणि अक्कलकोट शहरातून शेकडो प्रवेश घडवून आणले आहेत. साठे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेले पॅनल निवडून आणण्याचे कसब साठे यांनी यापूर्वीच दाखवून दिले आहे.

मूळ शिवसेनेत फूट पडल्यावर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणारा राज्यातला पहिला

समर्थक म्हणून महेश साठे यांची ओळख आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टोकाची टीका होत असताना साठे यांनी स्थानिक विरोधकांशी दोन हात केले. ही पार्श्वभूमी प्रस्थापित भाजप नेत्यांनाही ठाऊक असल्यामुळे साहजिकच साठे यांच्या राजकीय चालीचा विचार साऱ्यांनाच करावा लागणार आहे. तथापि, नगरपालिका निवडणूक त्यांनी पक्षादेशाच्या निर्णयावर ठेवली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर नगरपालिका निवडणुकीबाबत विविध घडामोडींवर शक्य तसा तर्क काढण्यात येतो आहे.

मागील नगरपालिका निवडणुकीत परिचारक प्रणित भाजपने ३६ प्लसचा नारा देत २२ नगरसेवक निवडून आणले आणि नगरपालिकेवर पहिल्यांदा बहुमताने सत्ता स्थापन केली. कीग्रेस, राष्ट्रवादीला इतर जागांवर समाधान मानावे लागले होते.

Web Title: Grand alliance in the state for the upcoming elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 03:08 PM

Topics:  

  • BJP Politics
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Local Body Election: गुहागरात महाविकास आघाडीची यादी जाहीर; जिल्ह्यात महायुतीची घोषणा मात्र अद्याप…
1

Local Body Election: गुहागरात महाविकास आघाडीची यादी जाहीर; जिल्ह्यात महायुतीची घोषणा मात्र अद्याप…

पंढरपुरात बदलतंय राजकीय समीकरण; तरुण नेतृत्त्वावर महाविकास आघाडीचा विश्वास
2

पंढरपुरात बदलतंय राजकीय समीकरण; तरुण नेतृत्त्वावर महाविकास आघाडीचा विश्वास

Maharashtra Politics: खेडमध्ये महायुतीत ठिणगी तर ‘या’ नगरपंचायतीमध्ये…
3

Maharashtra Politics: खेडमध्ये महायुतीत ठिणगी तर ‘या’ नगरपंचायतीमध्ये…

कोल्हापुरातील ‘या’ भागात बदलली राजकीय समीकरणे; भाजपला मिळाला ‘नवा गडी’
4

कोल्हापुरातील ‘या’ भागात बदलली राजकीय समीकरणे; भाजपला मिळाला ‘नवा गडी’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.