आमदार बनसोडेंच्या मुलाला रत्नागिरीतून अटक; पिंपरी चिंचवड पोलिसांची कारवाई

दोन खुनी हल्ले केल्याप्रकरणी फरार असलेलेल्या पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुत्राला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी रत्नागिरीतून अटक केली. सिद्धार्थ बनसोडे असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

    पिंपरी : दोन खुनी हल्ले केल्याप्रकरणी फरार असलेलेल्या पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुत्राला अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी रत्नागिरीतून अटक केली. सिद्धार्थ बनसोडे असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.

    सिद्धार्थविरोधात 13 मे रोजी पिंपरीतील एजी इन्व्हायरो इन्फ्रा या कंपनीत जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्या प्रकरणी तसेच आमदाराला बोलण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीलाही जबर मारहाण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते.

    आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार झाल्याची घटनाही याच दरम्यान घडली होती. आपली दोन माणसे कामावर घेण्यावरून आमदार बनसोडे यांचे एजी एन्व्हायरो कंपनीचा मॅनेजर तानाजी पवार यांच्यासोबत बोलणे सुरू होते. मात्र, बोलण्याचे रूपांतर वादात झाले होते.