पुणे विभागातील १ लाख ७० हजार ४३१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले : विभागीय आयुक्त सौरभ राव

विभागात कोरोना बाधित २ लाख ३३ हजार ८५४ रुग्ण

पुणे : पुणे विभागातील १ लाख ७० हजार ४३१ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २ लाख ३३ हजार ८५४ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या ५७ हजार २१७ इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण ६ हजार २०६ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.६५ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ७२.८८ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १ लाख ६८ हजार ३८१ रुग्णांपैकी १ लाख २९ हजार ६२९ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३४ हजार ८०९ आहे. कोरोनाबाधित एकूण ३ हजार ९४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.३४ टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ७६.९९ टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १३ हजार ५०८ रुग्णांपैकी ७ हजार २०८ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ५ हजार ९१८ आहे. कोरोनाबाधित एकूण ३८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण १७ हजार ८०१ रुग्णांपैकी १३ हजार २२१ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ३ हजार ८४४ आहे. कोरोनाबाधित एकूण ७३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण ११ हजार ९२ रुग्णांपैकी ६ हजार २६ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ४ हजार ६२० आहे. कोरोनाबाधित एकूण ४४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण २३ हजार ७२ रुग्णांपैकी १४ हजार ३४७ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ८ हजार २६ आहे. कोरोनाबाधित एकूण ६९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण ५ हजार ९१६ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार ८५६, सातारा जिल्ह्यात ६२०, सोलापूर जिल्ह्यात ३८६ , सांगली जिल्ह्यात ३५७ तर कोल्हापूर जिल्ह्यात ६९७ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण १ लाख ६८ हजार ११९ नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी २ लाख ३३ हजार ८५४ नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.