व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वसाधारण सभा घेण्यासाठी १० लाखांचा खर्च

    पिंपरी : पिपरी-चिंचवड शहरात कोरोना साथीचा आलेख वाढत असल्याने महापालिकांच्या सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याच्या सूचना राज्य सरकारने केल्या होत्या. त्यानुसार, गेल्या महापालिका सभा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत.

    महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातून ऑनलाईन सभा घेण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग विथ कनेक्टर्स यंत्रणेकरिता १० लाख रूपयांच्या मर्यादेत दरपत्रक नोटीस प्रसिद्ध करून दर मागविण्यात आले. मानवस एंटरप्रायजेस यांनी ९ लाख ९५ हजार रूपये असा लघुत्तम दर सादर केला. हे दर अंदाजपत्रकीय रकमेच्या तुलनेत ०.३७ टक्क्यांनी कमी आहेत. त्यानुसार, त्यांच्यासमवेत करारनामा करून कामकाज आदेश देण्यात आला आहे.