१० वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; ६८ वर्षाच्या वृद्धावर गुन्हा

१० वर्षीय मुलीला चॉकलेट व पैसे देण्याचे आमिष दाखवले. मुलीला आडबाजूला झाडामध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच मुलीला मारण्याची धमकी दिली.

     

    पिंपरी: १० वर्षांच्या चिमुकलीला चॉकलेट आणि पैशांचे आमिष दाखवून तिला आडबाजूला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना बालाजीनगर-भोसरी येथे घडली.

    सावन गंगाराम डोळस (वय ६८, रा. फुलेनगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  आरोपी डोळस याने फिर्यादी यांच्या १० वर्षीय मुलीला चॉकलेट व पैसे देण्याचे आमिष दाखवले. मुलीला आडबाजूला झाडामध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. तसेच मुलीला मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. पांचाळ तपास करत आहेत.