जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांना १०० कोटींची थकहमी

बारामती: पुणे जिल्ह्यातील छत्रपती, निरा भिमा, राजगड,घोडगंगा,विघ्नहर या पाच सहकारी साखर कारखान्यांना ९८.०२ कोटींची थकहमी मिळालेली आहे. या साखर कारखान्यांना ही थकहमी मिळल्याने चालू उस गळीत हंगामासाठी मोठी उभारी मिळणार आहे. राज्यातील ३२ साखर कारखान्यांना ५१६ कोटींची शासन हमी मिळाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील वरील पाच साखर कारखान्यांना ९८.०२ कोटींची थकहमी मिळाली आहे. यामध्ये विघ्नहर सहकारी साखर कारखान्याला २४ कोटी, शिरूर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारीला २०.२७ कोटी,भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याला २८.४२ कोटी, इंदापूर तालुक्यातील निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याला १५.४० कोटी तर भोर तालुक्यातील राजगड सहकारी साखर कारखान्याला १० कोटी अशा प्रकारे ९८.०२ कोटी थकहमी या पाच कारखान्यांना मिळालेली आहे. दरम्यान सर्वच साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर ऊसाची उपलब्धता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह राज्यात उच्चांकी उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे.राज्यातील ३२ साखर कारखान्यांना ५१६ कोटींची थकहमी देण्यात आली आहे.