राज्यातील ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण ; तर २७ विषयांचा निकाल १०० टक्के

राज्याच्या दहावीच्या परिक्षेत कोकण विभागाने बाजी मारली आहे. विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३१ हजार १६८ विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत.

    पुणे: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान निकालात कोकणाने बाजी मारली असून १०० टक्के निकाल लागला आहे. यंदाही मुलींनीच बाजी मारली असून दहावीच्या २७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तर
    शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी यावेळी एकूण ९५७ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असल्याची माहिती दिली आहे. तर ८३ हजार ९६२ विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत.

    यंदाही कोकणाची बाजी
    राज्याच्या दहावीच्या परिक्षेत कोकण विभागाने बाजी मारली आहे. विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ३१ हजार १६८ विद्यार्थ्यांपैकी सर्वच विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहेत. त्यामुळे विभागाचा निकाल १०० टक्के लागले आहे. सर्वात कमी निकाल नागपूरचा (९९.८४)लागला आहे.

    पुणे  ९९.९६
    नागपूर  ९९.८४
    औरंगाबाद ९९.९६
    मुंबई ९९.९६
    कोल्हापूर ९९.९२
    अमरावती ९९.९८
    नाशिक ९९.९६
    लातूर ९९.९६
    कोकण १००

    इथे पाहा निकाल
    mahresult.nic.in

    sscresult.mkcl.org

    maharashtraeducation.com

    असा पहा निकाल
    – दहावीचा निकाल पाहण्यासाठी वर दिलेल्या संकेतस्थळावर जा.

    – त्यानंतर Maharashtra SSC Result 2021 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.

    – त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.

    – Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2021 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.

    – तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.