शिरूर तालुक्यातील २३ गावात दिवसभरात १०३ कोरोना बाधित रुग्ण

कवठे येमाई :शिरूर तालुक्यातील २३ गावात आज दिवसभरात १०३ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आज कोरोना बाधितांचे आकड्याने शिरूर तालुक्यात उच्चांक केला आहे. एका ७५ वर्षे पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र शिंदे यांनी दिली.

तालुक्‍यातील रांजणगाव गणपती येथील ७५ वर्ष पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.शिरूर तालुक्यातील कोरोना बाधित यांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुक्यात अजूनही ठोस उपाय योजना सुरू केलेल्या नाहीत यामुळे प्रशासनाबाबत नागरिकांमध्ये नाराजी आहे. कोरोनाचा पादुर्भाव थांबवायचा कसा ? याबाबत प्रशासनाकडे कुठलेही ठोस कार्यक्रम आज तरी नाही.शिरूर तालुक्यात कोरोनाचा आकडा वाढतच असून रोज मृत्यू होत आहेत. ही बाब शिरूर तालुक्यातील नागरिक व प्रशासनाला चिंता वाढवणारी आहे.

शिरूर तालुक्यातील पारोडी १, न्हावरा २, कोरेगाव भिमा २, अण्णापूर ३, तळेगाव ढमढेरे १०, शिक्रापूर १८, बाभुळसर खु. २, शिरूर ग्रामीण ५, गणेगाव दुमाला १, कारेगाव ४, मलठण १, तर्डोबाचीवाडी २, विठ्ठल वाडी १, निमगाव भोगी २, जातेगाव बु. २, पिंपळे जगताप १, पिंपळे खालसा १, मोराची चींचोली (शास्ताबाद)१, सणसवाडी ४, रांजणगाव गणपती ५, टाकळी भिमा ३, टाकळी हाजी २, शिरूर शहर ३० असे शिरूर तालुक्यातील २३ गावात १०३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.