दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण मिळणार

कोविड - १९ या महामारीमुळे असामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे. २०२० - २१ या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात, दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देताना आठवी व नववीत घेतलेल्या क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा. तसेच त्या विद्याथ्र्यास केवळ २०२० - २१ या शैक्षणिक वर्षासाठीच सवलतीचे क्रीडा गुण देण्यात येणार आहेत.

    पिंपरी :  यंदाच्या २०२० – २१ या शैक्षणिक वर्षात परीक्षा देणाऱ्या दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देण्यात यावेत, यासाठी गेल्या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य शासनाचे कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी दिले आहेत. ही सवलत केवळ २०२० – २१ या शैक्षणिक वर्षातील परीक्षेसाठीच देण्यात येत आहे, हे विशेष !

    कोविड – १९ या महामारीमुळे असामान्य परिस्थिती निर्माण झाली आहे. २०२० – २१ या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात, दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे गुण देताना आठवी व नववीत घेतलेल्या क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा. तसेच त्या विद्याथ्र्यास केवळ २०२० – २१ या शैक्षणिक वर्षासाठीच सवलतीचे क्रीडा गुण देण्यात येणार आहेत. तसेच २०२० – २१ या वर्षात बारावी परीक्षेस प्रविष्ट विद्याथ्र्यांच्या बाबतीत गेल्या वर्षीचे अर्थात, अकरावीच्या विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात यावा, अन् या विद्याथ्र्यांनाही केवळ २०२० – २१ या शैक्षणिक वर्षासाठीच सवलतीचे क्रीडा गुण देण्यात येणार आहेत. दरम्यान, याबाबत शालेय शिक्षण विभागाने ८ फेब्रुवारी २०२१ रोजी क्रीडा सवलत गुणाबाबतचे पत्र दिले होते. या पत्राच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांनी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव (पुणे) यांना शुक्रवारी पत्राद्वारे कळविले आहे.