वीज कोसळून ११ जण ठार; राज्यात अवकाळी पावसाची स्थिती कायम

गेल्या काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. नेहमीच अंदाज चुकविणाऱ्या हवामान खात्याचा अंदाज मात्र यावेळी खरा ठरला आहे. पुण्यासह राज्यातील अनेक शहरांना अवकाळी पावसाने झोडपले. काही ठिकाणी अवकाळी गारपिट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसानही झाले आहे. एकीकडे कोरोनाविरोधात लढा सुरू असतानाच दुसरीकडे अस्मानी संकटानेही त्यात भर घातल्योन सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. दरम्यान , राज्यात पावसाची स्थिती कायम असून पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

    पुणे : गेल्या काही दिवसांपूर्वी हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. नेहमीच अंदाज चुकविणाऱ्या हवामान खात्याचा अंदाज मात्र यावेळी खरा ठरला आहे. पुण्यासह राज्यातील अनेक शहरांना अवकाळी पावसाने झोडपले. काही ठिकाणी अवकाळी गारपिट झाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसानही झाले आहे. एकीकडे कोरोनाविरोधात लढा सुरू असतानाच दुसरीकडे अस्मानी संकटानेही त्यात भर घातल्योन सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत. दरम्यान, राज्यात पावसाची स्थिती कायम असून पुण्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

    रविवारी आणि सोमवारी राज्यभरात विविध ठिकाणी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले . तसेच राज्यात अनेक ठिकाणी विजा पडल्याने विविध ठिकाणी किमान ११ लोकांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे. मराठवाड्यात एकूण पाच शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे पुण्याजवळील भोर याठिकाणी वीज पडून दोन चिमुकल्यांचा जीव गेला.

    जळगाव, धुळे, पुणे, अहमदनगर, नाशिक नंदुरबार, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेने वर्तवला आहे. याठिकाणी तुफान वादळासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.