fraud

फिर्यादी यांच्या मुलांना नोकरीची आवश्यकता होती. त्यावेळी आरोपीची ओळख झाली. त्याने फिर्यादी यांच्या मुलांना नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्यांना एसबीआय बँक, दारूगोळा कारखाना व रेल्वेत क्लार्क म्हणून नोकरी लावू असे आमिष दाखविले.

    पुणे : दारूगोळा कारखाना, एसबीआय बँक तसेच रेल्वेत नोकरी लावण्याच्या अमिषाने तरूणांची तब्बल ११ लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ६० वर्षीय व्यक्तीने कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलांना नोकरीची आवश्यकता होती. त्यावेळी आरोपीची ओळख झाली. त्याने फिर्यादी यांच्या मुलांना नोकरी लावण्याचे अमिष दाखविले. त्यांना एसबीआय बँक, दारूगोळा कारखाना व रेल्वेत क्लार्क म्हणून नोकरी लावू असे आमिष दाखविले. फिर्यादी यांच्या मुलांसोबतच इतरांना देखील त्याने नोकरी लावण्याचे अमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतले. फिर्यादी व इतरांकडून असे एकूण ११ लाख १६ हजार रुपये घेतले. पण, त्यांना नोकरी न लावता त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. हा प्रकार फेब्रुवारी २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालवाधीत घडली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक वरपडे हे करत आहेत.