राज्यात ११,११९ नवे रुग्ण, ४२२ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात ११,११९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६,१५,४७७ झाली आहे. राज्यात १,५६,६०८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज ४२२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २० हजार ६८७ वर पाहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.३६ टक्के एवढा आहे. 

राज्यात ४२२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ४९, ठाणे २२, नवी मुंबई मनपा ८, कल्याण डोंबिवली मनपा १०, वसई विरार मनपा ३, रायगड २५, पनवेल ३६, नाशिक १६, अहमदनगर १७, जळगाव ११, पुणे ७०, पिंपरी चिंचवड मनपा १९, सोलापूर १३, सातारा ११, कोल्हापूर १६, सांगली ११, नागपूर ३४ आणि अन्य २ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या ४२२ मृत्यूंपैकी ३२७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २८ मृत्यू ठाणे जिल्हा १४, रायगड ४, नाशिक ३, कोल्हापूर २,सोलापूर २, जळगाव १, सांगली १ आणि पुणे १ असे आहेत. आज ९,३५६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ४,३७,८७० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.१४ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३२,६४,३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६,१५,४७७ (१८.८५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११,३५,७४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३८,१७५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.