पुण्यात १ हजार १५८ रुग्ण कोरोनामुक्त  ; गेल्या २४ तासांत नवीन ६८३ रुग्ण वाढले

शहरात आजपर्यंत ४ लाख ६७ हजार ५४१ कोरोना रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ४ लाख ५१ हजार ७० रुग्ण बरेही झाले आहेत. तर ८ हजार ११५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासांत ८ हजार ७५१ संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

    पुणे : शहरात नवीन काेराेनाबाधितांच्या तुलनेत काेराेनामुक्त हाेणाऱ्यांची संख्या वाढत अाहे. गेल्या चाेवीस तासांत ६८३ नवीन रुग्ण आढळले असुन, री १ हजार १५८ रुग्ण काेराेनामुक्त झाले अाहे. तर पुण्यातील २७ रुग्णांसह ३७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

    शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ८ हजार ३५६ पर्यंत कमी झाली आहे. यापैकी १ हजार २० रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. तर २ हजार १२४ रुग्णांना अाॅक्सिजन पुरवठा केला जात आहे. शहरात आजपर्यंत ४ लाख ६७ हजार ५४१ कोरोना रुग्ण आढळून आले असून त्यापैकी ४ लाख ५१ हजार ७० रुग्ण बरेही झाले आहेत. तर ८ हजार ११५ जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मागील चोवीस तासांत ८ हजार ७५१ संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.