Modi temple in Pune

अनेकदा मोदी भक्त हा शब्द ऐकला आहे. मात्र, त्यामुळे पुण्यामध्ये एका मोदीभक्ताने यालाच साजेशी कृती केली आहे. पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे. पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपाच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले आहे.

    पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका भक्ताने मोदींना चक्क देवाचा दर्जा देऊन त्यांचे मंदिरच उभारले आहे. अर्थात यामध्ये मोदी भक्तांना काही आश्चर्य वाटत नसले, तरी सर्वसामान्य लोकांसाठी मोदींचे मंदिर हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. यापूर्वी आपण अनेकदा मोदी भक्त हा शब्द ऐकला आहे. मात्र, त्यामुळे पुण्यामध्ये एका मोदीभक्ताने यालाच साजेशी कृती केली आहे. पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे. पुण्यातील औंध भागामधील मयूर मुंढे या भाजपाच्या कार्यकर्त्याने स्वतःची मालकी असलेल्या जागेत हे मंदिर उभारले आहे.

    जयपूरहून आणला पुतळा

    पिंपरी चिंचवड येथील मार्बल विक्रेते दिवानशु तिवारी यांनी खास जयपूरमधून मोदींचा पुतळा तयार करून घेतला आहे. याकरिता 1 लाख 60 हजार रुपये खर्च आले आहेत. 15 ऑगस्ट 2021 दिवशी औंधमधील ज्येष्ठ नागरिक के. के. नायडू यांच्या हस्ते या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले आहे. मंदिरासमोर मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता मोदी भक्तांकरिता लावण्यात आली आहे. मंदिराबाहेर असलेल्या फलकावर आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख देखील या कवितेच्या आधारे मांडण्यात आली आहे. या मंदिरावरून मला विरोधकांनी ट्रोल केले गेले तरी चालेल, पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते. त्याकरिता हे मंदिर उभारले असल्याचे मयूर मुंढेनी यावेळी सांगितले आहे.

    विष्णूचे 11 वे अवतार

    आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख मुंढेंनी त्यांच्या कवितेच्या आधारे ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. खरंतर मोदींना उपमा देण्यासाठी भक्तांची दररोज नवनवी कसरत चालू असते. काही दिवसांपूर्वी भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनीही मोदीस्तुती करणारे एक ट्विट केले होते. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की नरेंद्र मोदी हे विष्णूचे 11 वे अवतार आहेत. ते देवासमान आहेत. ते देशाची सेवा करत आहे. या विषयावर विरोधकांनी टीका टिप्पणी केली होती. त्यांनतर आता तर थेट मोदींचे मंदिर उभारले गेले आहे त्यामुळे आता चर्चा तर होणारच.