कोरोना रुग्णांसाठी १२ कार्डीयाक ॲम्बुलन्स व रक्तपेढीसाठी १ मिनी बस दाखल

सर्व कार्डीयाक ॲम्बुलन्स व मिनीबस मे. टाटा मोटर्स लि. या कंपनीकडून ( Gem पोर्टलवरील दरानुसार) खरेदी करण्यात आलेल्या आहेत. या सर्व १२ कार्डीयाक ॲम्बुलन्स व एक मिनीबस उद्यापासून रुग्णसेवेसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या ताफ्यामध्ये दाखल होत आहेत.

    पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातून रुग्णालयात जाणे-येणेसाठी रुग्णांची धावाधाव होत आहे. कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे बऱ्याच रुग्णांची रुग्णालयामध्ये वाहतुक करताना ऑक्सिजन, व्हेन्टीलेटरची गरज भासत आहे. अशी रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महापालिकेच्या वतीने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या महापौर निधीतून यशवंतराव चव्हाण रुग्णालयाकरीता २ कार्डीयाक ॲम्बुलन्स व रक्तपेढीसाठी रक्तसंकलन कर्मचारी वाहतूक करणे व रक्तपेढी सामानासाठी एक मिनीबस खरेदी करण्यात आली आहे. याशिवाय महापालिका निधीतून १० कार्डीयाक ॲम्बुलन्स खरेदी करण्यात आलेल्या आहेत. या सर्व कार्डीयाक ॲम्बुलन्स व मिनीबस मे. टाटा मोटर्स लि. या कंपनीकडून ( Gem पोर्टलवरील दरानुसार) खरेदी करण्यात आलेल्या आहेत. या सर्व १२ कार्डीयाक ॲम्बुलन्स व एक मिनीबस उद्यापासून रुग्णसेवेसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या ताफ्यामध्ये दाखल होत आहेत.

    कार्डीयाक ॲम्बुलन्सची आसन क्षमता ८ सिटची असून यामध्ये स्टेचर, ऑक्सिजन/व्हेन्टीलेटर करीता व्यवस्था, स्टोअरेज व्यवस्था असुन या सर्व वातानुकूलन आहेत. तसेच रक्तपेढीसाठी खरेदी केलेली मिनीबस मे. टाटा मोटर्स लि. कंपनीची टाटा स्टार बस या प्रकारची असुन तिची आसन क्षमता २५ सिट इतकी आहे व ती देखील वातानुकूलन आहे. या कार्डीयाक ॲम्बुलन्स व मिनीबस महापालिकेच्या रुग्णसेवेत दाखल झाल्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय टळणार असून रुग्णांना तातडीचे व वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.