१२ आमदारांची नियुक्ती १५ दिवसात होणं अपेक्षित होतं : घटनातज्ज्ञ उल्हास बापट

या पार्श्वभूमीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वर्तणूक घटनेशी सुसंगत नसल्याचं म्हटलंय. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती १५ दिवसांत होणं अपेक्षित होतं. मात्र, अनेक महिने झाले तरी नियुक्ती नाही. राज्यपालांचे हे वर्तन घटनेशी सुसंगत नाही.

    पुणे : राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा मुद्दा आता चांगलाच गाजतोय. अशावेळी या १२ आमदारांची यादी गहाळ झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र, आता ही यादी राज्यपालांकडे असल्याचा खुलासा राजभवनाकडून करण्यात आला आहे. यावरुन राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे.

    या पार्श्वभूमीवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची वर्तणूक घटनेशी सुसंगत नसल्याचं म्हटलंय. राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती १५ दिवसांत होणं अपेक्षित होतं. मात्र, अनेक महिने झाले तरी नियुक्ती नाही. राज्यपालांचे हे वर्तन घटनेशी सुसंगत नाही.

    पंतप्रधानांच्या सल्ल्याने जसं राष्ट्रपती वागतात, तसं मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपालांनी वागणं अपेक्षित असल्याचं उल्हास बापट यांनी म्हटलंय. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार मराठा आरक्षणाबाबत सुधारणा किंवा बदल करण्याचा अधिकार आता संसदेला असल्याचंही बापट यांनी म्हटलंय.