A fire broke out in a factory in Taloja industrial estate, killing a firefighter
प्रतिनिधिक फोटो

सुमारे दीड तास रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. सोसायटीतील रहिवाशी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. आग लागलेल्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    पिंपरी:आयटी पार्क हिंजवडी-माण रस्त्यावरील एका सोसायटीत १२ मजली इमारतीत चौथ्या मजल्यावर आगबी लागल्याची दुर्घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवत आतमध्ये अडकलेल्या १३ जणांची सुखरूप सुटका केल्याने मोठा अनर्थ टळला.

    हिंजवडी आयटी पार्कमध्ये टप्पा क्रमांक एक मधील माण रस्त्यावर असलेल्या अशोक मिडॉज सोसायटी आहे. सोसायटीतील १२ मजली असणाऱ्या एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लिफ्ट जवळील मोकळ्या भागात असलेल्या विद्युत केबल्सला अचानक आग लागली. या आगीमुळे चौथा आणि पाचवा मजला धुराने वेढला गेला. १३ नागरिक आतमध्ये अडकल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. एमआयडीसी टप्पा एक अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसी टप्पा तीन आणि पीएमआरडीए अग्निशामक दलाचा प्रत्येकी एक बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत आग विझविण्यास आणि इमारतीत चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर अडकलेल्या १३ नागरिकांना जिन्यातून सुखरूप बाहेर काढले. वरील मजल्यांवरील सर्व नागरिक गच्चीवरून बाजूच्या इमारती मध्ये प्रवेश करून खाली आले. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. सुमारे दीड तास रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. सोसायटीतील रहिवाशी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. आग लागलेल्या मजल्यावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    ''आगीमुळे मोठ्या प्रमाणात धुर निर्माण झाला होता. आग आटोक्यात आणण्याबरोबरच रहिवाशांना सुखरूप बाहेर काढणे गरजेचे होते. त्यासाठी दोन टीम तयार करून रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यात आले. आग आटोक्यात आणल्यानंतर एखादी व्यक्ती धुरामुळे बेशुद्ध पडू शकते, ही शक्यता लक्षात घेऊन तीन मजल्यावरील सर्व पॅसेज, लिफ्टची पाहणी करण्यात आली. कोणी अडकले नसल्याची खात्री झाल्यावर रेस्क्यू ऑपरेशन थांबविण्यात आले. त्यानंतर सोसायटीच्या व्यवस्थापकाला सर्व रहिवाशांना क्लब हाऊसमध्ये नेण्यास सांगून कोणी इमारतीत अडकले नसल्याची पुन्हा खात्री करण्यात आली़'' रामदास चोरगे , अग्निशमन अधिकारी