पुण्यातील जम्बो कोविड रुग्णालयातील १२० कर्मचाऱ्यांचा राजीनामा

१२० कर्मचाऱ्यांनी एकत्र राजीनामा दिल्याने या हॉस्पिटलमध्ये पुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. यामध्ये कोविड सेंटरमधल्या ४० डॉक्टर्स आणि ८० नर्सचा समावेश आहे. परंतु कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे जम्बो कोविड सेंटरचा कारभार आता प्रशासन ताब्यात घेणार आहे.

पुण्यातील कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्य सरकारने हे जम्बो हॉस्पिटल तयार करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी तब्बल ८० कोटीहून अधिक खर्च आला आहे. हॉस्पिटलमध्ये पुरेसे डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांना त्यांचे उपचार करून घेण्यास समस्या निर्माण होत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अशा परिस्थितीत १२० कर्मचाऱ्यांनी एकत्र राजीनामा दिल्याने या हॉस्पिटलमध्ये पुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. यामध्ये कोविड सेंटरमधल्या ४० डॉक्टर्स आणि ८० नर्सचा समावेश आहे. परंतु कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे जम्बो कोविड सेंटरचा कारभार आता प्रशासन ताब्यात घेणार आहे.

पुण्यात कोरोनाची रूग्णसंख्या सर्वाधिक आहे. पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे या रुग्णालयात ८०० बेडची क्षमता असतानाही सध्या ३३० बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे ‘जम्बो’बाबत हलगर्जीपणा करुन खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली. महापालिकेकडून याठिकाणी डॉक्टर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. रूग्णांची कुठलेही हाल होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली आहे.