पिंपरी-चिंचवड महापालिका
पिंपरी-चिंचवड महापालिका

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे पहिले दोन हफ्ते जानेवारी महिन्यामध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर आणखी १४० कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे. पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे पहिले दोन हफ्ते देण्यात येणार असल्याची माहिती महापौर माई ढोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे आदी उपस्थित होते.

पिंपरी (Pimpari).  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे पहिले दोन हफ्ते जानेवारी महिन्यामध्ये देण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर आणखी १४० कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे. पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचे पहिले दोन हफ्ते देण्यात येणार असल्याची माहिती महापौर माई ढोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सद्यस्थितीत 7 हजार 624 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. 2 हजार 200 अधिकारी व कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 ते 31 मे 2020 पर्यंतचा सातव्या वेतन आयोगाचा फरक एकूण 5 हप्त्यांमध्ये रोखीने अदा करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार जुलै 2020 व जानेवारी 2021 मध्ये देय असणारे फरकाचे 2 हप्ते जानेवारी महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. या दोन्ही हप्त्यांची एकूण रक्कम सुमारे 140 कोटी रुपये आहे. त्यानुसार कार्यरत कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना देय असणारी आवश्‍यक तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली आहे. तसेच कर्मचाऱ्यांना उर्वरित 3 हप्ते प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलै महिन्यात देण्यात येणार आहेत.