विजेचा बसला झटका; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

    देहूगाव : येलवाडी (ता. खेड) येथे एका सोळा वर्षीय बालकाचा विद्युत प्रवाहित तारेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. प्रेम खंडगावडे (वय १६, रा. येलवाडी गाव, खळवडी वस्ती, खेड) असे विद्युत प्रवाहित तारेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

    घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम हा सकाळी साडेआठच्या सुमारास घराच्या बाहेर पडला होता. इंद्रायणी नदीजवळ असणाऱ्या शेवकर यांच्या शेतामध्ये विजेच्या तारेशेजारी तो निपचीत पडलेला आढळून आला. जवळच पडलेल्या प्रवाहित विद्युत तारेचा शॉक लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. दुर्घटनेची माहिती मिळताच म्हाळुगे पोलीस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी पाचारण केले. घटनास्थळाची पाहणी केली.