सासरच्या जाचाला कंटाळून १८ वर्षीय विवाहितेची गळफास लावून आत्महत्या

सायली मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये सायलीचे आकाश तमांचे याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती व सासू सासऱ्यांनी तिला त्रास दिला. किरकोळ कारणावरून भांडण करत. तर, माहेरी जाण्यास व फोन करण्यास विरोध करत होते. या त्रासाला कंटाळून सायलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

    पुणे:   लग्नानंतर सासरच्या मंडळींनी माहेरी जाण्यास व फोनवर बोलण्यास विरोध केल्याने १८ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर परिसरात घडली. सायली आकाश तमांचे (वय १८) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी आकाश उर्फ सुमित तुकाराम तमांचे (वय २५), तुकाराम अजिनाथ तमांचे (वय ४७) आणि संगीता तुकाराम तमांचे (वय ४०, सर्व रा. फुरसुंगी) या तिघांना अटक केली आहे. याबाबत हनुमंत किसन डोरले (वय ४५, रा. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.

    सायली मूळची उस्मानाबाद जिल्ह्यातील आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये सायलीचे आकाश तमांचे याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर पती व सासू सासऱ्यांनी तिला त्रास दिला. किरकोळ कारणावरून भांडण करत. तर, माहेरी जाण्यास व फोन करण्यास विरोध करत होते. या त्रासाला कंटाळून सायलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.