पुण्यात गेल्या २४ तासांत  १८० कोरोनाबाधित ;  ३३ जणांचा मृत्यू

आजपर्यंत शहरांत एकुण ४ लाख ६९ हजार ९२७ रुग्ण आढळून आले, त्यापैकी ४ लाख ५५ हजार ६५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तर ८ हजार २५६ नागरीकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

    पुणे : शहरातील काेराेनाची स्थिती नियंत्रणात येऊ लागली आहे. गेल्या चाेवीस तासांत १८० काेराेनाबाधित आढळून आले आहे. मार्च महीन्यानंतर प्रथमच एका दिवशी दाेनशेच्या आत नवीन काेराेनाबाधित रुग्ण आढळून आले आहे.
    गेल्या चाेवीस तासांत शहरातील २४ जणांसह एकुण ३३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या चाेवीस तासांत एकुण ७५१ जण काेराेनामुक्त झाले आहे. तर सक्रीय रुग्णांची संख्या ६ हजार २० पर्यंत खाली आली आहे. या सक्रीय रुग्णांपैकी ८४४ रुग्णांची प्रकृती गंभीर असुन, १ हजार ५८१ रुग्णांना अाॅक्सिजन पुरवठा सुरू आहे. मे महीन्यात काेराेनाच्या संसर्गाचा वेग कमी हाेण्याचे प्रमाण वाढले हाेते. या कालावधीत नवीन रुग्णांच्या तुलनेत काेराेनामुक्त हाेणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने काेराेनाची दुसरी लाट ओसरू लागल्याचे दिसत हाेते. आता काेराेनाची परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट हाेत आहे.
    आजपर्यंत शहरांत एकुण ४ लाख ६९ हजार ९२७ रुग्ण आढळून आले, त्यापैकी ४ लाख ५५ हजार ६५१ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहेे.तर ८ हजार २५६ नागरीकांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे.