कोल्हापूर जिल्ह्यात १८२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

कोल्हापूर - आज (दि.२१ मे) सकाळी १० वाजता ३४६ प्राप्त अहवालापैकी ३ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. अखेर जिल्ह्यात एकूण १८२ पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ५२ रुग्ण आढळले

 कोल्हापूर – आज (दि.२१ मे)  सकाळी १० वाजता ३४६  प्राप्त अहवालापैकी ३ अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. अखेर जिल्ह्यात एकूण १८२ पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत ५२ रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ बी सी केम्पी-पाटील यांनी दिली.

तालुका, नगर पालिका आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे – आजरा- ११, भुदरगड- १८, चंदगड- ६, गडहिंग्लज- ५, गगनबावडा- ३, हातकणंगले- १, कागल- १, करवीर- ११, पन्हाळा- १३, राधानगरी- ३३, शाहूवाडी- ५२, शिरोळ- ५, नगरपरिषद क्षेत्र- ६, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-१३ असे एकूण १७८ आणि पुणे-१, कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-१ इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण १८२ रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. अद्याप बहुतांश अहवाल प्राप्त व्हावयाचे असल्याने रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी १६३८ अहवाल निगेटिव्ह
काल दिनांक २० मे रोजी रात्री ८.३० पर्यत १२९५ आणि आज सकाळी १० वाजेपर्यंत ३४३ असे एकूण १६३८ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी आहे.
जिल्ह्यातील सीपीआर, आयजीएम, डॉ. डी. वाय. पाटील, आयसोलेशन हॉस्पीटल या प्रमुख हॉस्पीटलसह गडहिंग्लज, चंदगड, आजरा, राधानगरी, हातकणंगले, कागल, भूदरगड, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, शिरोळ, अतिग्रे येथील संजय गोडावत हॉस्टेल, अॅपल हॉस्पीटल आणि आधार हॉस्पीटल या एकूण १८ ठिकाणी स्वॅब कलेक्शन करण्यात येते. 
काल रात्री ८.३० पर्यंत प्राप्त झालेल्या १३३८ अहवालांपैकी १२९५ तर आज सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या  ३४६ अहवालांपैकी ३४३ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ही दिलासा देणारी बाब आहे.