तिघांकडून चोरीच्या १९ दुचाकी जप्त; पिंपरी पोलिसांची कारवाई

तिन्ही चोरट्यांकडून १० लाख पाच हजार रुपये किमतीच्या १९ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. या कारवाईमुळे हिंजवडी, वाकड, तळेगाव दाभाडे आणि डेक्कन पोलीस ठाण्यातील १४ गुन्हे उघडकीस आले आहेत.

    पिंपरी: हिंजवडी पोलिसांनी एका वाहन चोरट्याला अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. तिघांकडून चोरी केलेल्या १० लाख पाच हजार रुपये किमतीच्या १९ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यामुळे १४ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

    पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार अतिक शेख व श्रीकांत चव्हाण यांना माहिती मिळाली की, दोन मुलांनी शिंदेवस्ती-मांरुजी येथून एक मोपेड गाडी चोरी केली आहे. ते गाडी घेऊन शिवाजी चौक-हिंजवडी येथे येणार आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला आणि दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या गाडीबाबत विचारणा केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून तपास केला असता त्यांनी हिजवडी, वाकड, तळेगाव दाभाडे येथे दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले.

    अन्य एका कारवाईमध्ये पेट्रोलिंग दरम्यान हिंजवडी पोलिसांनी गोविंद शंकर धाड (वय २५, रा. वाकड. मूळ रा. यवतमाळ) याला अटक केली. तिन्ही चोरट्यांकडून १० लाख पाच हजार रुपये किमतीच्या १९ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या. या कारवाईमुळे हिंजवडी, वाकड, तळेगाव दाभाडे आणि डेक्कन पोलीस ठाण्यातील १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. अन्य पाच दुचाकीच्या मूळ मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.

    ही कारवाई पोलीस कृष्णप्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त सुधीर हिरेमठ, पोलीस उपआयुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सांवत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड, सुनिल दहिफळे, तपास पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काटे, पोलीस उपनिरीक्षक, समाधान कदम, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक महेश वायबसे, बंडू मारणे, पोलीस अंमलदार बाळकृष्ण शिंदे, किरण पवार, कुणाल शिंदे, अतिक शेख, रितेश कोळी, शिवराम भोपे, चंद्रकांत गडदे, श्रीकांत चव्हाण, कारभारी पालवे, ओमप्रकाश कांबळे, अमर राणे, दत्ता शिंदे, झनकसिंग गुमलाडु, सुभाष गुरव, नुतन कोंडे, रेखा धोत्रे यांनी केली आहे.