वेंगसरकर अ‍ॅकॅडमीच्या इमारत कामांसाठी २ कोटींची वाढ; महापालिकेच्या सभेत मंजुरी

या इमारतीचे काम पूर्ण करण्यास प्रशासकीय मान्यता रक्कम अपुरी पडत आहे. त्यासाठी दोन कोटी इतक्या वाढीव प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे. पुर्वीची प्रशासकीय मान्यता पाच कोटी इतकी आहे. त्यामध्ये दोन कोटी रूपये इतक्या रकमेची वाढ करून सात कोटी रूपये इतकी प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार, अ‍ॅकॅडमीच्या पॅव्हेलियनच्या उर्वरीत कामासाठी महापालिका सभेत सात कोटी रूपये इतकी वाढीव प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

    पिंपरी: पिंपरी – चिंचवड महापालिकेचे थेरगाव – बापुजीबुवानगर येथे वेंगसरकर अ‍ॅकॅडमीच्या पॅव्हेलियनच्या इमारतीचे काम सुरू आहे. या कामासाठी प्रशासकीय मान्यता पाच कोटी इतकी आहे. मात्र, या इमारतीत स्थापत्य आणि विद्युत विषयक विविध कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी दोन कोटी इतक्या वाढीव प्रशासकीय मान्यतेस महापालिका सभेत मंजुरी देण्यात आली.

    थेरगाव- बापुजीबुवानगर येथे पिंपरी – चिंचवड महापालिकेचे वेंगसरकर अ‍ॅकॅडमीच्या पॅव्हेलियनचे उर्वरीत काम सद्यस्थितीत सुरू आहे. या कामाचा अंदाजपत्रकात समावेश होता. परंतु, प्रत्यक्ष साईटवरील कामाच्या आवश्यकतेनुसार सुधारीत बांधकाम परवाना आणि अग्निशमन प्रतिबंधक योजना या मानांकानुसार मुळ अंदाजपत्रकाच्या मोजमापात वाढ होत आहे. स्थापत्य विषयक कामात पॅव्हेलियनच्या इमारतीस टफन विथ लॅमिनेटड ग्लास लावणे, मैदानाच्या दर्शनीय बाजूस जाळी लावणे, सिमाभिंतीस मुख्य प्रवेशद्वार बसविणे, गच्चीवरील किचन युनिट, सीमाभिंतीची उंची वाढविणे, जमिनीखालील पाण्याची टाकी, गच्ची आणि तळमजल्यावरील फर्निचर करणे, इमारतीच्या सभोवतालचा परिसर सुशोभिकरण करणे, मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा केबिन, इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील काचेचे छत या बाबी आवश्यक असल्याने अंदाजपत्रकात वाढ होत आहे. इमारत पूर्ण व वापरात आणण्याच्या दृष्टीने ही कामे करणे गरजेचे आहे.

    विद्युत विषयक कामाच्या करारनाम्यात अग्निशामक प्रतिबंधक योजना, अग्निशामक जिना या बाबींचा समावेश नव्हता. परंतु, इमारत पुर्णत्वाचा दाखला व अग्निशामक प्रतिबंधक योजना यांच्या मानंकानुसार मुळ अंदाजपत्रकात समावेश नाही. या कामाच्या करारनाम्यात यांत्रिक वायुजीवन शौचालयासाठी, इंटरनेट वायफाय सिस्टीम, इंटरकॉम सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे, डेकोरेटीव्ह लाईटस या बाबींचा समावेश नव्हता. परंतु, कामाच्या आवश्यकतेनुसार ही सर्व कामे करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्थापत्य आणि विद्युत विभागाच्या सुधारीत अंदाजपत्रकात १ कोटी ५३ लाख रूपये इतकी वाढ होत आहे. उर्वरीत कामे करारनाम्यानुसार महापालिकेला पूर्ण करून देणे आवश्यक आहे. या कारणांमुळे या इमारतीचे काम पूर्ण करण्यास प्रशासकीय मान्यता रक्कम अपुरी पडत आहे. त्यासाठी दोन कोटी इतक्या वाढीव प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता आहे. पुर्वीची प्रशासकीय मान्यता पाच कोटी इतकी आहे. त्यामध्ये दोन कोटी रूपये इतक्या रकमेची वाढ करून सात कोटी रूपये इतकी प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार, अ‍ॅकॅडमीच्या पॅव्हेलियनच्या उर्वरीत कामासाठी महापालिका सभेत सात कोटी रूपये इतकी वाढीव प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

    दवाखान्याच्या ५व्या मजल्याच्या कामासाठी १४ कोटीची वाढ

    थेरगाव – बापुजीबुवा नगर येथे दवाखान्याच्या इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. या कामांमध्ये डॉक्टरांच्या निवासस्थानाकरिता पाचव्या मजल्याचे वाढीव बांधकाम करायचे आहे. या कामाकरिता १४ कोटी ३० लाख रूपये इतकी निविदा रकमेत वाढ होत आहे. या वाढीव रकमेसह सुधारीत निविदा रक्कम ६३ कोटी २४ लाख रूपये इतकी होत आहे. ही रक्कम ६३ कोटी ३८ लाख या मुळ प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेत आहे. तथापि, या कामाच्या स्वरूपात बदल झाला असल्याने सुधारीत प्रशासकीय मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार, ६३ कोटी २४ लाख रूपये इतकी सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्याचा ठराव महापालिका सभेत मंजुर करण्यात आला.