आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन भीषण अपघात घडले आहेत. पुणे मुंबई हायवेवर आज सकाळी वेगवेगळ्या २ ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर १० जण जखमी आहेत. जखमींवर नजिकच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Maharashtra: In two separate accidents on Pune-Mumbai Highway, 3 people died and 10 were injured in early hours today.
— ANI (@ANI) January 11, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यामध्ये कात्रज बोगद्यातून आज पहाटे पाचच्या सुमारास एक दारूची वाहतूक करणारा ट्रक मुंबईकडे जात होता. हा ट्रक भूमकर पूलावर येताच मागून येणार्या ट्रकने त्याला धडक दिली. या अपघातामध्ये ट्रक चक्काचूर झाला आहे. यावेळेस ट्रकमधील दोन व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे पुलावर वाहतूक खोळंबली होती.
तर दुसरा अपघात हा पिंपरी चिंचवडमध्ये किवळेहद्दीत असलेल्या मुंबई- बॅंगलोर महामार्गावर पहाटे ४ च्या आसपास झाला आहे. यामध्ये ५० प्रवासी घेऊन जाणाऱ्या खाजगी बसने टेम्पोला मागून धडक दिली आहे. या अपघातात बसमधील एकाचा मृत्यू झाला आहे. तर काही प्रवासी जखमी आहे. दरम्यान चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि टेम्पोवर बस आदळली. या अपघातातील जखमी औंध जिल्हा रूग्णालयात आणि काही खाजगी रूग्णालयात दाखल आहेत.