poltry farm

शिक्रापूर : सर्वत्र रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पहाटे वेळ नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे तळेगाव ढमढेरे येथील बाजार मैदानातील अनेक दुकानांसह पांढरी वस्ती येथील कुक्कुट पालनासाठी बांधलेल्या पोल्ट्रीमध्ये पाणी घुसल्याने साधारण २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तलाठी ज्ञानेश्वर भराटे यांनी सांगितले आहे.

शिक्रापूर : सर्वत्र रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे पहाटे वेळ नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे तळेगाव ढमढेरे येथील बाजार मैदानातील अनेक दुकानांसह पांढरी वस्ती येथील कुक्कुट पालनासाठी बांधलेल्या पोल्ट्रीमध्ये पाणी घुसल्याने साधारण २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तलाठी ज्ञानेश्वर भराटे यांनी सांगितले आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) सह वेळ नदीच्या महापुरामुळे शिक्रापूर- तळेगाव ढमढेरे रस्ता वाहतुकीसाठी आज दिवसभर पूर्णता बंद होता. यामुळे अनेक गावांचा दिवसभर संपर्क तुटला होता. तर तळेगाव ढमढेरे च्या पांढरीवस्ती मध्ये राहणारे नवनाथ भुजबळ यांच्या कुक्कुटपालनाच्या शेडमध्ये पाणी घुसल्यामुळे ५ हजार ७०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या असून यामध्ये त्यांचे तब्बल १३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तर बाजार मैदानात अनेक व्यवसायिकांची विविध प्रकारची दुकाने असून वेळ नदीला मध्यरात्रीनंतर मोठ्या प्रमाणात अचानक महापूर आल्याने हे पाणी हनुमान मंदिराच्या पायथ्याशी आल्याने बहुतांश दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.