fraud

फिर्यादी यांच्या मालकीची पिंपळे निलख येथील सर्व्हे नं. २०/३/१ मधील १३ आर या क्षेत्रापैकी जमीन आहे. या जमिनीवर आरोपींनी आपसांत संगनमत करून कंपाऊंड घातले. तसेच अनधिकृतपणे फलक लावून त्या ठिकाणी उभे राहिले. आरोपी अमोल इंगवले यास कोणी कुंपण घातले, अशी विचारणा महिला फिर्यादी यांनी केली असता त्याने आरडा ओरडा करीत दहशत निर्माण करीत आपणच कुंपन घातल्याचे त्याने सांगितले.

    पिंपरी :  जमिनीवर बेकायदेशीररित्या कंपाऊंड मारून तसेच फलक उभारून आरडा ओरडा करीत धमकी देणाऱ्या २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे निलख येथे बुधवारी (दि. १९) सकाळी घडली.

    अमोल चंद्रकांत इंगवले, आदित्य राम इंगवले, अशोक बाळकृष्ण इंगवले, दत्तात्रय जयवंत इंगवले, चंद्रकांत भगवान इंगवले, राम बळवंत इंगवले, विजय आनंद इंगवले, इंगवलेचा जावई बंडू बालवडकर आणि इतर बारा जण (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत एका महिलेने बुधवारी (दि. १९) याबाबत सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मालकीची पिंपळे निलख येथील सर्व्हे नं. २०/३/१ मधील १३ आर या क्षेत्रापैकी जमीन आहे. या जमिनीवर आरोपींनी आपसांत संगनमत करून कंपाऊंड घातले. तसेच अनधिकृतपणे फलक लावून त्या ठिकाणी उभे राहिले. आरोपी अमोल इंगवले यास कोणी कुंपण घातले, अशी विचारणा महिला फिर्यादी यांनी केली असता त्याने आरडा ओरडा करीत दहशत निर्माण करीत आपणच कुंपन घातल्याचे त्याने सांगितले.

    त्यावर फिर्यादी यांनी सदरची जमीन माझी असल्याचे त्यांना सांगितले. त्यावेळी इतर आरोपींनीही आरडा ओरडा करीत फिर्यादी यांना धमकावले. काय करायचे ते करा, असे म्हणत सर्व आरोपी निघून गेले. फिर्यादी यांच्या कायदेशीररित्या ताब्यात असलेल्या जमीनी मध्ये जाण्यासाठी आरोपींनी कुंपण लावून अडथळा आणला. तसेच हिच्याकडे बघून घेऊ, अशी धमकी दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.