द्रुतगती महामार्गावर ५ महिन्यांत २१ जणांचा मृत्यू

वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसूल केला जातो.त्यामुळे प्रत्येक वाहनचालक चेकनाक्याजवळ पोलीसांना दिखावा करण्यासाठी वाहनाचा वेग कमी करतो.परंतु, चेकनाक्यावरुन वाहन पुढे निघताच वाहनचालक सुसाट वाहन चालवतात.अशा प्रकारामुळे अपघात वाढले आहेत.

    पिंपरी : वाहनांची संख्या कमी असतानाही वाहन अतिवेगाने चालविल्यामुळे द्रुतगती महामार्गावर अपघात वाढले असून, पाच महिन्यांत २१ जणांचा मृत्यू झाला.कोरोनामुळे पुणे – मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहनांची संख्या नेहमीपेक्षा कमी असतानाही या वर्षीच्या सुरवातीपासून अपघाताचे सत्र सुरु झाले.पळस्पे, खालापूर, बोरघाट आणि उर्से टोल नाका या ठिकाणी चेकनाके उभारला आहे.तसेच या ठिकाणी विशेष पोलीस पथकांमार्पâत वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून दंड वसूल केला जातो.त्यामुळे प्रत्येक वाहनचालक चेकनाक्याजवळ पोलीसांना दिखावा करण्यासाठी वाहनाचा वेग कमी करतो.परंतु, चेकनाक्यावरुन वाहन पुढे निघताच वाहनचालक सुसाट वाहन चालवतात.अशा प्रकारामुळे अपघात वाढले आहेत.