मुळा धरणात २१ टीएमसी पाणीसाठा

राहुरी : मुळा धरणसाठा शनिवारी सायंकाळी २१ हजार ९१४ दशलक्ष घनफूट म्हणजे ८५ टक्के भरला आहे .पाण्याची आवक ७ हजार ३१० क्यूसेकने सुरू आहे.गेल्या वीस-बावीस वर्षांच्या काळात धरण ऑगस्टमध्ये पाचव्यांदा भरण्याची शक्यता आहे .

पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने मुक्काम केला असून धरणाकडे कोतुळकडील मुळा नदीतून आठ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे . आज सकाळी धरणाकडे लहीत खुर्द येथून सव्वा तीन मीटरला नऊ हजार १५५ क्यूसेकने धरणाकडे वाहत होती . धरणात२४ तासात पाऊण टीएमसी पाणी जमा झाले आहे . धरणसाठा २१ टीएमसी वर पोहोचला . पाण्याची पातळी १ हजार ८०३ फुटांवर पोहोचले आहे . गेल्या आठ दिवसात पाणीसाठ्यात वाढ झाली असून या काळात धरणाचा पाणी पातळी मध्ये साडेतेरा फुटांनी वाढ झाली आहे . यापूर्वी विस-बावीस वर्षांत ऑगस्टमध्ये चार वेळा ओव्हरफलो झालेले आहे , ,१५ ऑक्‍टोबर रोजी मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल तर जाहीर करण्यात येते . गेल्या वीस वर्षात अकरा वेळा धरण भरलेले नाही २००५ , २००६, २००७ ही तिन वर्ष ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होऊन विसर्ग सोडण्यात आला होता .

मुळा धरणाकडे पाण्याची आवक पाहता साडे पंचवीस टीएमसी साठा झाल्यानंतर केव्हाही धरणातून मुळा नदी पात्रात पाणी सोडले जाऊ शकते ऑगस्ट महिना संपायला अजून दहा दिवस बाकी आहे ,उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे . धरणाची पाणलोट क्षेत्रात पाऊस पाहता गणेशोत्सव काळात मुळा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या असून मुळा लाभक्षेत्रातील राहुरी ,नगर ,पाथर्डी , शेवगाव , नेवासा तालुक्यात सर्वांचे तसेच गणेश भक्तांचे देखील लक्ष लागून राहिले आहे .