हुंड्यासाठी होत असलेल्या छळाला कंटाळून २१ वर्षीय विवाहितेची आत्महत्या, सासरच्यांना अटक

आरतीकुमारी यादव ही फिर्यादी यांची पुतणी आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये तिचे सुनीलकुमार यादव याच्यासोबत लग्न झाले होते. हे पूर्व फुरसुंगीतील सिद्धी ग्रीन सोसायटीत राहत होते. लग्न झाल्यानंतर तिचा हुंड्यासाठी छळ होत होता. हुंड्याच्या मागणीसाठी तिच्याशी भांडण करून शिवीगाळ आणि मारहाण होत होती. तिला उपाशी ठेवले जात होते. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते.

    पुणे : हुंड्यासाठी मारहाणकरत उपाशी ठेवून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून एका २१ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना फुरसुंगीत घडली. आरतीकुमार सुनीलकुमार यादव (वय २१) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचा नाव आहे. याप्रकरणी सुनीलकुमार यादव (वय २९), सासू सासरे, ननंद यांच्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत राकेशकुमार राय (वय ४५) यांनी तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरतीकुमारी यादव ही फिर्यादी यांची पुतणी आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये तिचे सुनीलकुमार यादव याच्यासोबत लग्न झाले होते. हे पूर्व फुरसुंगीतील सिद्धी ग्रीन सोसायटीत राहत होते. लग्न झाल्यानंतर तिचा हुंड्यासाठी छळ होत होता. हुंड्याच्या मागणीसाठी तिच्याशी भांडण करून शिवीगाळ आणि मारहाण होत होती. तिला उपाशी ठेवले जात होते. तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. या छळाला कंटाळून तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत.