‘वायसीएमएच’च्या मांडवासाठी २२ लाखांचा खर्च

महापालिका क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ठिकठिकाणी सीमा प्रतिबंधित करणे, पोलीसांना पहारा देण्यासाठी आणि बंदोबस्तासाठी मंडप टाकणे, प्रतिबंधित क्षेत्र फ्लेक्स लावणे आदी कामांसाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकात महापालिकेच्या मान्य दर पृथ्थकरणाप्रमाणे दर घेण्यात आले आहेत.

    पिंपरी : महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालय आवारात ठिकठिकाणी रूग्णांच्या नातेवाईकांसाठी कक्ष, आरटीपीसीआर टेस्ट, ब्लड बँक, पोलीस, गृह विलगीकरण, फिवर क्लिनीक आदींसाठी मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भारतीय जैन संघटना शाळा येथे अ‍ॅण्टीजेन टेस्टसाठी मंडप व्यवस्था केली आहे. २२ लाख रूपये खर्चाचे हे काम कोणतीही निविदा न काढता थेट पद्धतीने देण्यात आले आहे.

    पिंपरी – चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालय आवारात ठिकठिकाणी रूग्णांच्या नातेवाईकांसाठी कक्ष, आरटीपीसीआर टेस्ट, ब्लड बँक, पोलीस, गृह विलगीकरण, फिवर क्लिनीक आदींसाठी मंडप व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच भारतीय जैन संघटना शाळा येथे अ‍ॅण्टीजेन टेस्टसाठी मंडप व्यवस्था करण्याबाबत महापालिका अतिरिक्त आयुक्त यांनी सुचना दिल्या आहेत. त्यानुसार, वायसीएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद ्रवाबळे यांच्यासमवेत चर्चा करून अत्यावश्यक मंडप व्यवस्था करण्यासाठी पाहणी करण्यात आली. त्याप्रमाणे कामासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकात महापालिकेच्या मान्य दर पृथ्थकरणाप्रमाणे दर घेण्यात आले आहेत. या कामाचा खर्च मध्यवर्ती भांडार विभागाकडील ‘कोरोना निधी’ या लेखाशिर्षामधून करता आला आहे. या मंडप व्यवस्थेसाठी २२ लाख २१ हजार रूपये खर्चाचे काम कोणतीही निविदा न काढता आणि करारनामा करून थेट पद्धतीने लालदीप कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आल आहे. या प्रस्तावाला अतिरिक्त आयुक्त यांनी १९ एप्रिल २०२१ रोजी मान्यता दिली आहे.

    ह क्षेत्रीय हद्दीतील मंडप साठीही २२ लाख

    महापालिका क्षेत्रीय कार्यालय हद्दीत ठिकठिकाणी सीमा प्रतिबंधित करणे, पोलीसांना पहारा देण्यासाठी आणि बंदोबस्तासाठी मंडप टाकणे, प्रतिबंधित क्षेत्र फ्लेक्स लावणे आदी कामांसाठी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या अंदाजपत्रकात महापालिकेच्या मान्य दर पृथ्थकरणाप्रमाणे दर घेण्यात आले आहेत. या मंडप व्यवस्थेसाठीही २२ लाख २१ हजार रूपये खर्च होणार आहे. हे कामसुद्धा कोणतीही निविदा न काढता आणि करारनामा करून थेट पद्धतीने लालदीप कन्स्ट्रक्शन यांना देण्यात येणार आहे.