शिरूर शहर व परिसरात २२  रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह

शिरूर : शिरूर शहरातील दोन तर तालुक्यात २० असे २२  रूग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेद्र शिंदे व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील यांनी दिली.

गुरूवार दि.३० रोजी शिरूर शहरातील गुजरमळा एक व विठ्ठल नगर एक तर तालुक्यातील सणवाडी १,शिक्रापुर १,तळेगाव ढमढेरे १,कोरेगाव भिमा २,रांजणगाव २,वाघाळे १,मांडवगण १,सादलगाव १,शिरूर ग्रामीण ४,गणेगाव दुमाला १,केंदुर १,तर्डोबाचीवाडी २,जातेगाव १,पिंपरी दुमाला १ असे तालुक्यातील १५ गावांत २२ रूग्णांचे अहवाल कोरोना बाधित आले असुन केंदुर येथील एक रूग्ण मयत झाला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजेद्र शिंदे व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ.तुषार पाटील यांनी दिली.

शिरूर तालुक्यात १५ गावांतील २२ जणांचे अहवाल गुरूवारी कोरोना बाधित आल्याने रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे तालुक्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले झाले.