हवेली तालुक्यात आज २२७ बाधित रूग्ण आढळले  तर २३१ जणांची  कोरोनावर मात

शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. आरोग्य, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक नाहक घराबाहेर पडत आहेत. आवश्यक ती सर्व काळजी न घेतल्याने रूग्णसंख्येत वाढ होत असताना दिसत आहे. तालुक्यातील नागरिक मास्क न वापरता फिरत असताना दिसत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही धोकादायक बाब आहे. यांचेवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.

    थेऊर: हवेली तालुक्यात आज बुधवार ( १९ मे ) रोजी २२७ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर २३१ जण कोरोनावर मात करून घरी परतलेे आहेत.

    तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या २२७ बाधितांमुळे एकूण रूग्णसंख्या ३३ हजार ५७१ झाली आहे. तर २३१ कोरोनामुक्तांमुळे कोरोनावर मात करून घरी परतलेल्यांची एकून संख्या ३० हजार ९३५ झाली आहे. आज ८ जण मृत्यूमुखी पडले त्यामुळे आजअखेर एकूण मयतांची संंख्या ६१७ झाली आहे. आज २४३ जणांवर उपचार सुरू आहेत.

    गावनिहाय बाधितसंख्या गावाचे नाव, रूग्णसंख्या याप्रमाणे – मांजरी बुद्रुक ४३, वाघोली ३१, नांदेड २५, देहू व कोंढवे धावडे प्रत्येकी १८, न-हे १२, कुंजीरवाडी ९, नायगांव ७, उरूळी कांचन, सोरतापवाडी व लोणीकंद प्रत्येकी ५, मांजरी खुर्द व कोलवडी प्रत्येकी ४, लोणी काळभोर, आळंदी म्हातोबाची, कोरेगांवमुळ, श्रीरामनगर, मांगडेवाडी, आगळंबे व अष्टापूर प्रत्येकी ३, कदमवाकवस्ती, शिंदवणे, पेरणे, तरडे, औताडे हंडेवाडी, कोंढणपूर, गाऊडदरा व वढू खुर्द प्रत्येकी २, थेऊर, गोगलवाडी, डोंगरगांव, भावडी, न्यू कोपरे व आव्हाळवाडी प्रत्येकी १ असे एकून २२७

    यासंदर्भात अधिक माहिती देताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन खरात म्हणाले, की शासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. आरोग्य, पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही नागरिक नाहक घराबाहेर पडत आहेत. आवश्यक ती सर्व काळजी न घेतल्याने रूग्णसंख्येत वाढ होत असताना दिसत आहे. तालुक्यातील नागरिक मास्क न वापरता फिरत असताना दिसत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही धोकादायक बाब आहे. यांचेवर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस व ग्रामपंचायत प्रशासनावर सोपवण्यात आली आहे. यापुढील काळात धडक कारवाई करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन खरात यांनी केले आहे.