प्रतिबंधीत गुटख्यासह २३ लाख ७३ हजार ८४९ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त ; भिगवण पोलिसांची कारवाई

भिगवण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की गुरुवारी मध्यरात्री व शुक्रवारी दि.११ जून रोजी ०० वाजून ३० मिनिटांनी पुणे सोलापूर राजमार्गावर मौजे भादलवाडी गावचे हद्दीत पोलीस हवालदार इन्कलाब रशिद पठाण, होमगार्ड माने हे हायवे पेटालिंग करीत असताना चाॅकलेटी रंगाच्या आयशर टेंपो (क्रमांक MH-४५-AF-५४५४) मध्ये पांढऱ्या रंगाचे एकूण ४ गोण्या आढळून आल्या

    भिगवण : महाराष्ट्र सरकारकडून विक्रीस बंदी असलेल्या गुटका व सुगंधी सुपारीची अवैद्यरित्या वाहतूक करणाऱ्या तिघांवर भिगवण पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली असून यामध्ये भिगवण पोलिसांनी एकूण २३ लाख ७३ हजार ८४९ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    पोलीस हवालदार इन्कलाब रशिद पठाण यांच्या फिर्यादीवरुन भिगवण पोलीसांत आरोपी ज्ञानेश्वर दगडू महाकाळ वय -२७ वर्षे, सुनिल मारूती बिचकुले वय -२१ वर्षे,अमोल प्रकाश साळुके सर्व रा.बामणी ता.सांगोला जि.सोलापूर व माल घेणारा विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    भिगवण पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी,की गुरुवारी मध्यरात्री व शुक्रवारी दि.११ जून रोजी ०० वाजून ३० मिनिटांनी पुणे सोलापूर राजमार्गावर मौजे भादलवाडी गावचे हद्दीत पोलीस हवालदार इन्कलाब रशिद पठाण, होमगार्ड माने हे हायवे पेटालिंग करीत असताना चाॅकलेटी रंगाच्या आयशर टेंपो (क्रमांक MH-४५-AF-५४५४) मध्ये पांढऱ्या रंगाचे एकूण ४ गोण्या आढळून आल्या, त्यापैकी ३ गोणीत RMD ४ चे बॉक्स व २ सेंटेड तंबाखूचे बॉक्स व १ गोणीत RMD ४ चे बॉक्स ५ लाख ८०० रूपये किमतीचा विक्रीस प्रतिबंधित असलेला माल मिळून आला.

    याशिवाय या टेंम्पोत बांधकामासाठी लागणाऱ्या ५ लाख ७३ हजार ८४९ रुपये किमतीच्या लोखंडी सळया मिळून आल्या असून १३ लाख रूपये किमतीचा MH-४५- AF-५४५४ चॉकलेटी रंगाचा आयशर टेंम्पो असा एकूण २३ लाख ७३ हजार ८४९ रूपये किमतीचा मुद्देमाल भिगवण पोलीसांनी जप्त केला असून अधीक तपास भिगवण सहाययक पोलीस निरीक्षक जीवन माने करीत आहेत