25 Corona rushed to save the lives of the patients; Special felicitation of Police Inspector Balkrishna Sawant

मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. अनेक ठिकाणी बेड आणि ऑक्शिजनचा तुटवडा होता. त्याच दरम्यान हिंजवडी येथील एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सिलेंडर संपले होते. २५ रुग्णाच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याच वेळी देवदूत म्हणून धावून येत बाळकृष्ण सावंत यांनी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मदतीने तत्काळ सिलेंडर उपलब्ध करून दिल्याने २५ रुग्णांना जीवदान मिळाले होते. याच कार्याची प्रामुख्याने दखल घेत पत्रकार संघाने सावंत यांची सत्कार मूर्ती म्हणून निवड केली.

    पिंपरी : ऑक्सीजन सिलेंडर संपल्याने २५ रुग्णाच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला त्या वेळी खाकी तील देवदूत म्हणून धावून आलेले हिंजवड़ी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला. कोरोना काळात उल्लेखनीय काम करणारे पोलीस निरीक्षक सावंत यांचा आरोग्य मंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण भवन येथे गौरव करण्यात आला.

    महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फ़े सन्मान देवदूतांचा या विशेष कार्यक्रमात कोरोना काळात स्वताच्या जीवाची बाजी लावत इतरांचे जीव वाचविणाऱ्या कोरोना योध्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन आज रविवारी मुंबई येथे करण्यात आले होते. त्यामध्ये खाकी वर्दीतील देवमाणूस म्हणून हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे, विजय सिंह पटवर्धन, आशुतोष पाटील, विवेक गिरधारी, आयोजक किरण जोशी, पी एन कदम आदी उपस्थित होते.

    मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला होता. अनेक ठिकाणी बेड आणि ऑक्शिजनचा तुटवडा होता. त्याच दरम्यान हिंजवडी येथील एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन सिलेंडर संपले होते. २५ रुग्णाच्या जीवनमरणाचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्याच वेळी देवदूत म्हणून धावून येत बाळकृष्ण सावंत यांनी मुळशीचे तहसीलदार अभय चव्हाण यांच्या मदतीने तत्काळ सिलेंडर उपलब्ध करून दिल्याने २५ रुग्णांना जीवदान मिळाले होते. याच कार्याची प्रामुख्याने दखल घेत पत्रकार संघाने सावंत यांची सत्कार मूर्ती म्हणून निवड केली.

    सावंत यांनी हिंजवडी पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यापासून अवैध धंद्याला चाप बसला असून व्हाईट कॉलर गुन्हेगार आणि लैंड माफियाला लगाम बसला आहे. सर्वात मोठ्या धाडशी कारवाया सावंत यांनी केल्या आहेत. ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना सोबत घेवून ठाण्याचा कारभार अतिशय योग्य रित्या चालविण्यात सावंत यांना यश आले आहे. पोलीस आणि नागरिकांमध्ये सलोखा तयार केल्याने पोलिसांबद्धलचा आदर अधिकच वाढला आहे. खऱ्या अर्थाने पोलीस हे नागरिकांचे मित्र आहेत हे आपण नुसते ऐकत होतो परंतु सावंत यांच्यामुळे ‘पोलीसमित्र’ हि संकल्पना प्रत्यक्षात नागरिकांनी अनुभवली आहे.