शिरूर व परिसरात दिवसभरात बाधित २५ रुग्ण आढळले ; कोरोनाबाधितांचा आकडा ६४८ वर

कवठे येमाई :  शिरूर शहर व  तालुक्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत असून त्यामुळे नागरिकांची मोठीच चिंता वाढली आहे. शिरूर तालुक्यातले १० गावामध्ये  आज दिवसभरात २५ कोरोना बाधित रुग्ण आढ ळले असल्याची माहिती शिरुर तालुका वैदयकीय अधिकारी राजेंद्र शिदे यांनी दिली. शिरूर तालुक्यात कोरोना बाधितांचा आता आकडा आज ६४८ वर जाऊन पोहचला 

 शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली, कर्डिलेवाडी, भांबर्डे, या गावात कोरोना बाधित रुग्ण प्रथमच आढळले आहेत. तर कवठे येमाईत ही आज दि. ०९ ला नव्याने एका रुग्नाची भर पडल्याने गावात कोरोना बाधितांची संख्या आज ३ वर पोहचली आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या नागरिकांमध्ये चिंता वाढविणारी आहे.

शिरूर शहरात भाजीबाजार येथील ६२ पुरुष, तर गुजर मळा येथे ५० वर्षे पुरुष असे दोघेजण कोरोना बाधित आढळले आहेत.यामुळे शिरुर शहरातील कोरोना बाधितांचा  आकड़ा ११८ एवढा झाला असल्याची माहिती शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील यांनी दिली आहे.तर शिरूर तालूक्यातील कोरेगाव भीमा ४, शिक्रापूर ६, कारेगाव ६, मोराची चिंचोली १, विठ्ठल वाडी १, कर्डिलेवाडी १,भाम्बर्डे १,तडोबावाडी १, बढ़ बुद्रक १ व शिरुर शहर २ तसेच शिरूर तालूक्यातील १० गावात २४ कोरोना वाधित रुग्ण आटळले आहेत.

शिरुर शहरात अनेक कोरोना बाधित रुग्णांचा परिसर प्रतिबंधित करण्यात आलेला नाही. तर अनेक ठिकाणी नागरिक संपूर्ण परिसर प्रतिबंध करू देत नसल्याचे दिसून आले आहे. त्यात अनेक कोरोना बाधित रुग्णाच्या नातेवाईकांची कोरोना तपासणी आरोग्य प्रशासनाच्या वतीने झालेली नाही. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचे नातेवाईक व हाय रिस्क कॉन्टॅक्ट नागरिक शिरूर शहरात खुलेआम फिरताना दिसत आहेत. 

हीच परस्थिती ग्रामीण भागातील प्रतिबंधीत,बफर क्षेत्रे जाहीर केलेल्या गावातून दिसून येत असून नागरिकांना कोरोना संसर्गाचे व प्रशासन देत असलेल्या सूचनांचे गांभीर्यच नसल्याचे दिसत आहे.मास्क न लावता मला काही होणार नाही या थाटात विनाकारण फिरणे,गरज नसताना दुचाकीवरून गावात फिरणे यावर नायंत्र ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग अलर्ट असला तरी ज्या गावात बंद ठेवण्यात आला आहे त्या गावात स्थानिक ग्रामपंचायत,ग्राम दक्षता कमेटी व महसूल विभागाने कडक भूमिका घेऊन नागरिकांना घरी सुरक्षित राहण्याकामी प्रशासनाच्या सूचनांची कडक अमलबजावणी प्रसंगी अशा बेजाबदार व बेफिकिरीने वागणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे आता गरजेचे झाले आहे.