प्रोडक्टची माहिती देण्यासाठी ग्राहकाला भेटविण्याच्या बहाण्याने २५ वर्षीय तरुणीवर बलात्कार

तरुणी ही ओरीफ्लेम प्रोडक्टची माहिती देण्याचे काम करते. आरोपीने या प्रोडक्टची माहिती एका ग्राहकाला देण्यासाठी म्हणून पुणे स्टेशन परिसरातील लॉजवर बोलावले. त्या ठिकाणी गेल्यानंतर तरुणीला शीतपेयातून गुंगी येणारे औषध दिले. तरुणी बेशुध्द झाल्यानंतर आरोपीने तरुणीवर बलात्कार केला.

    पुणे : प्रोडक्टची माहिती देण्यासाठी ग्राहकाला भेटविण्याच्या बहाण्याने २५ वर्षीय तरुणीला लॉजवर घेऊन जात गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर त्याचे रेकॉर्डिंगकरून ते व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.याप्रकरणी धनंजय जाधव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी ही ओरीफ्लेम प्रोडक्टची माहिती देण्याचे काम करते. आरोपीने या प्रोडक्टची माहिती एका ग्राहकाला देण्यासाठी म्हणून पुणे स्टेशन परिसरातील लॉजवर बोलावले. त्या ठिकाणी गेल्यानंतर तरुणीला शीतपेयातून गुंगी येणारे औषध दिले. तरुणी बेशुध्द झाल्यानंतर आरोपीने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तिचे रेकॉर्डिंग केले.त्यानंतर या तरुणीला तू माझ्या सोबत संबंध ठेव, नाहीतर काढलेले व्हिडीओ व फोटो पतीला पाठविण्याची तसेच व्हायरल करण्याची धमकी देत असे. या त्रासाला कंटाळून तरुणीने कुटुंबियांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली