दत्तात्रय भरणे
दत्तात्रय भरणे

उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पात इंदापूर तालुक्यासाठी भरणे यांनी ही लक्षणीय आर्थिक तरतूद करवून घेतली आहे. या अर्थसंकल्पात रस्ते, पाणी, पूल, बंधारे व इतर विकासकामांसाठी जवळपास २ हजार कोटींची भरीव तरतूद करत असताना तालुक्यातील अतिमहत्वाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.

    इंदापूर : इदापूर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असलेले २५ रस्ते व १० पूल बांधण्यासाठी राज्यशासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून २६४ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती राज्यमंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

    उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून राज्याच्या अर्थसंकल्पात इंदापूर तालुक्यासाठी भरणे यांनी ही लक्षणीय आर्थिक तरतूद करवून घेतली आहे. या अर्थसंकल्पात रस्ते, पाणी, पूल, बंधारे व इतर विकासकामांसाठी जवळपास २ हजार कोटींची भरीव तरतूद करत असताना तालुक्यातील अतिमहत्वाच्या कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.

    -गोसावीवाडी ते विठ्ठलवाडी रस्तासाठी ७ कोटी
    यामध्ये तालुक्यातील हॅप्पी इंडिया कंपनी ते गोसावीवाडी ते विठ्ठलवाडी रस्ता (७ कोटी ५० लाख),लासुर्णे ते चिखली रस्ता (१ कोटी २० लाख), अंथूर्णे ते भरणेवाडी ते बिरंगुडवाडी रस्ता (६ कोटी ३० लाख), कळस बिरोबा मंदिर ते राष्ट्रीय महामार्ग रस्ता (६ कोटी), निंबोडी ते शेटफळगढे ते लाकडी रस्ता (१० कोटी ४४ लाख), मदनवाडी ते पिंपळे ते निरगुडे रस्ता (८ कोटी ६० लाख), तावशी ते उद्धट ते थोरातवाडी रस्ता (६ कोटी ४४ लाख), सराफवाडी ते निरवांगी ते खोरोची ते पिठेवाडी रस्ता (८ कोटी ५० लाख),न्हावी ते लोणीदेवकर रस्ता (४ कोटी), काटी ते रेडणी रस्ता (३ कोटी), काटी ते नीरा भीमा रस्ता (५ कोटी ११ लाख),शिरसोडी ते कालठण नं.२ ते गलांडवाडी रस्ता (५ कोटी), रेडणी ते चाकाटी रस्ता (८ कोटी), गडदेवाडी ते कौठळी रस्ता (५ कोटी ५० लाख),इंदापूर ते शहा रस्ता (२ कोटी), लोणी ते चांडगाव रस्ता (४ कोटी),पळसदेव वरकुटे ते कालठण नं. १ रस्ता (४ कोटी ३० लाख), वरकुटे खुर्द ते वडापुरी ते गलांडवाडी २ ते सरडेवाडी (९ कोटी २ लाख), अगोती नं.१ ते चांडगाव रस्ता (२ कोटी), तरंगवाडी ते गोरखळी रस्ता (२ कोटी), आडोबावस्ती ते नरसिंहपूर रस्ता (२ कोटी),लाखेवाडी ते पीठेवाडी ते सराटी ते गणेशवाडी रस्ता (७ कोटी) व कौठळी ते कर्मयोगी साखर कारखाना ते इंदापूर रस्ता (६ कोटी) होणार आहे.तर तालुक्यातील आशियाई विकास बँक योजनेंतर्गत बारामती भिगवण रस्त्यासाठी ४७ कोटी ३२ लाख व खडकी ते पारवडी ते शेटफळगढे ते भवानीनगर रस्त्यासाठी ६९ कोटी १३ लाखांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे.

    – भवानीनगर रस्त्यासाठी ६९ कोटी १३ लाखांचा निधी मंजूर
    कळस ते लोणी रस्त्यावरील पूल बांधणे (३ कोटी ५० लाख), बाभूळगाव ते भांडगाव रस्त्यावरील पुलांसाठी (३ कोटी),सराफवाडी ते रेडा रस्त्यावरील पूल बांधणे (१ कोटी ७५ लाख), शिरसोडी ते भांडगाव रस्त्यावरील पूल बांधणे (३ कोटी ५० लाख), सराफवाडी ते पिठेवाडी रस्त्यावरील पूल बांधणे (४ कोटी),तरंगवाडी ते गोखळी रस्त्यावरील पूल बांधणे (७० लाख), पिंपरी ते नरुटेवाडी रस्त्यावरील पूल बांधणे (१ कोटी), वडापुरी रेडणी रस्त्यावरील पूल बांधणे (१ कोटी), वरकुटे खुर्द ते गलांडवाडी २ रस्त्यावरील पूल बांधणे (१ कोटी) तर शेळगाव ते व्याहाळी रस्त्यावरील पूल बांधणे (१ कोटी) ही कामे होणार आहेत.

    -नीरा नदीवर पूल बांधण्याच्या कामासाठी १ कोटी
    चौकट :  भूसंपादन व विश्रामगृहासाठी ३ कोटी ९० लाख तालुक्यातील रेडणी बोराटवाडी ते उंबरे दहीगाव रस्त्यावरील नीरा नदीवर पूल बांधण्याच्या कामासाठी लागणारे भू संपादन करण्यासाठी १ कोटी ३० लाख तर लासुर्णे येथे विश्रामगृह बांधण्यासाठी २ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.